आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२३: कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील, अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:44 IST2023-04-25T07:31:16+5:302023-04-25T07:44:26+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's Horoscope, April 25, 2023, Sweetness will prevail in family life. There will be sudden wealth. Plan a trip | आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२३: कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील, अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल

आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२३: कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील, अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल

मेष: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. आणखी वाचा 

वृषभ: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल.  आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. आणखी वाचा 

कर्क:  आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.  आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळे लाभ होतील.  आणखी वाचा    

कन्या:   आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल.  आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल.  आणखी वाचा 

वृश्चिक: आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आणखी वाचा 

धनु:   आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. आणखी वाचा 

मकर:   आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.  आणखी वाचा 

कुंभ:  आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. आणखी वाचा 

मीन:   आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल.  आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, April 25, 2023, Sweetness will prevail in family life. There will be sudden wealth. Plan a trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app