Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 07:50 IST2023-07-04T07:48:49+5:302023-07-04T07:50:08+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी.

Horoscope: Today's Horoscope, 4 July 2023 | Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

मेष:   आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आणखी वाचा 

वृषभ:  आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.  आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. आणखी वाचा 

कर्क: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आणखी वाचा 

सिंह:   साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा 

कन्या:  आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. आणखी वाचा  

वृश्चिक: आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल.  आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल.  आणखी वाचा

मकर: आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल.  आणखी वाचा  

कुंभ: आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल.  आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

Open in app

Web Title: Horoscope: Today's Horoscope, 4 July 2023