संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:32 PM2024-05-13T12:32:35+5:302024-05-13T12:34:08+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले. 

Loksabha Election - Nehru-Indira and Rajiv Gandhi have done the work of changing the constitution; Narendra Modi counterattack | संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

नवी दिल्ली - Narendra Modi on India Alliance ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाईल, त्यासाठी अबकी बार ४०० पार असा नारा ते देतायेत असा आरोप काँग्रेस करतंय. मात्र संविधानासोबत विश्वासघात गांधी कुटुंबानेच केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, संविधान बनल्यानंतर सर्वात आधी संविधान पंडित नेहरूंनी बदललं. पंडित नेहरूंनी संविधानात दुरुस्ती केली. त्यात फ्रिडम ऑफ स्पीचला रेस्ट्रिक्ट केले. त्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी आली. ज्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात जात आणीबाणी आणली. देशात निवडणूक रद्द केली. संविधानाचा विश्वासघात त्यांनी केला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी आले. त्यांनी भारतातील मीडियाला कंट्रोल करण्यासाठी विधेयक आणले होते. देशातील मिडिया आणि विरोधी पक्षाने विरोध केला तेव्हा ते मागे हटले असं त्यांनी सांगितले. आज तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच सरकार संविधानातून बनते, सरकारची कॅबिनेट हवेत होत नाही. ती संविधानानुसार होते. राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटचा निर्णय पत्रकार परिषदेत काय केला ते सगळ्यांनी पाहिले. त्यांनी कागद फाडला नाही तर संविधानाचे तुकडे करत होते. बाबासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेसनं केले. धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात नाही, परंतु ते देण्याचं काम काँग्रेस करतंय. आम्ही धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, ना कुणाला करू देणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. 

दरम्यान, संविधानाबाबत आम्हाला आस्था आहे. संविधान कायम राहण्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी विरोधक आता संविधानावर बोलत आहेत. २०१९ ते २०२४ आमच्याकडे जवळपास ४०० जागा होत्या. आम्ही ३६० जिंकल्या होत्या. एनडीए ४०० च्या आसपास होती. बहुमत आल्यास संविधान बदललं जाईल हे चुकीचे आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

Web Title: Loksabha Election - Nehru-Indira and Rajiv Gandhi have done the work of changing the constitution; Narendra Modi counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.