PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:18 PM2024-05-16T20:18:09+5:302024-05-16T20:23:42+5:30

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मात देणाऱ्या हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

आता त्यांनी भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून शायराना अंदाज दाखवला. हिमाचल प्रदेशच्या सौंदर्याचे त्यांनी कौतुक केले.

भटकंतीचे फोटो शेअर करताना ओशिन यांनी लिहिले की, साहिल के सुकूँ से किसे इंकार है लेकिन तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है.

ओशिन ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात. समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या ओशिन यांनी तरूणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे.

त्या पेशाने अधिकारी असल्या तरी त्यांची शैली एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली पण कुटुंबीयांचा विरोध पाहता त्यांनी नकार दिला.

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ शिमला येथे घालवला. त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार पदावर होते आणि आई कांगडा येथे अधिकाऱ्याची पीए होती.

ओशिन यांना बीडीओ म्हणून पोस्ट करण्यात आले तेव्हाही त्यांची तयारी सुरूच होती. त्यांच्या समर्पणाचे आणि परिश्रमाचे फळ म्हणजे हिमाचल प्रशासकीय सेवेची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्यांनी दहावी रँक मिळवली.