जून-जुलैत सरकार ४ हजार देणार, शेतकऱ्यांनो ई-केवायसी केली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:30 PM2024-05-10T19:30:57+5:302024-05-10T19:31:28+5:30

Gondia : जिल्ह्यात ११९९ शेतकऱ्यांची केवायसी होणे बाकी

In June-July, the government will give 4 thousand, did the farmers do e-KYC? | जून-जुलैत सरकार ४ हजार देणार, शेतकऱ्यांनो ई-केवायसी केली का?

In June-July, the government will give 4 thousand, did the farmers do e-KYC?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. असे असले तरी अजूनही जिल्ह्यातील ११९९ शेतकऱ्यांनी अजूनही याकडे दुर्लक्ष केले आहे. पीएम किसान योजनेचा १८ वा, राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यांत मिळणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या एकूण चार हजारांसाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थीच्या खात्यात वर्ग केले जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनानेदेखील नमो महासन्मान योजना सुरू केली. त्यामुळे दोन्ही योजनांच्या मिळून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार मिळू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले.

ई-केवायसी पूर्ण झालेले शेतकरी : २ लाख १७ हजार ५२०
ई-केवायसी पूर्ण न झालेले शेतकरी : ११९९
जिल्ह्यातील एकूण शेतकरी : २,१८,७१९


जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी
तालुका                                 शेतकरी संख्या

आमगाव                                 २४१२९
अर्जुनी मोरगाव                        २६३०५  
देवरी                                      १७९२२
गोंदिया                                   ४७७८१
गोरेगाव                                   २४६९४
सडक अर्जुनी                           २४५४९
सालेकसा                                १६२७४
तिरोडा                                    ३७०६३


कृषी विभागाकडून जनजागृती
■ केवायसी आणि आधार सीडिंग न केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत संबंधितांना कळविण्यात आले. शिवाय जनजागृती- देखील करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी तत्काळ ही प्रकिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.

आगामी हप्त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
■ पीएम किसान योजनेचा १८ वा आणि नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै
महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. तत्पूर्वी केवायसी आहे. तत्पूवा करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये मिळणार नाहीत. स्वतः लाभार्थीना कोणत्याही अॅन्ड्रॉइड मोबाइलवरून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

७८९८ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग शिल्लक
पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना आधार सीडिंग करणे देखील अनिवार्य करण्यात आले. ७ मे पर्यंत जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ३६९ शेतकऱ्यांनी आधार सीडिंग पूर्ण केले असून अजूनही ७ हजार ८९८ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग शिल्लक आहे.

 

Web Title: In June-July, the government will give 4 thousand, did the farmers do e-KYC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.