TMC NMMC KDMC Results 2026 LIVE: शिंदेंच्या प्रभागात उद्धवसेनेने उधळला गुलाल; कोणाचा पराभव, कोण जिंकले?

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:25 IST2026-01-16T08:22:57+5:302026-01-16T20:25:18+5:30

Thane Navi Mumbai Kalyan Dombivli Municipal Election Results Winners List 2026 LIVE Updates: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर ...

TMC NMMC KDMC Municipal Election Results 2026 LIVE Updates Thane Navi Mumbai and Kalyan-Dombivli Mahanagar Palika Nikal in Marathi Ward-Wise Winners list latest News | TMC NMMC KDMC Results 2026 LIVE: शिंदेंच्या प्रभागात उद्धवसेनेने उधळला गुलाल; कोणाचा पराभव, कोण जिंकले?

TMC NMMC KDMC Results 2026 LIVE: शिंदेंच्या प्रभागात उद्धवसेनेने उधळला गुलाल; कोणाचा पराभव, कोण जिंकले?

Thane Navi Mumbai Kalyan Dombivli Municipal Election Results Winners List 2026 LIVE Updates: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येत आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या तीनही महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठाणे पालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत आहे. शिंदेसेनेला भाजपची साथ आहे, तर ठाकरेसेनेच्या सोबत मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडी स्वतंत्र लढणार आहे. नवी मुंबईत भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढली आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध गणेश नाईक अशी मूळ लढत आहे. तर राष्ट्रवादी, वंचित आणि मविआतील काही पक्ष स्वतंत्र लढले आहेत. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना-मनसे ठाकरे बंधू यांच्यात लढत आहे. या पालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र आहेत.

LIVE

Get Latest Updates

16 Jan, 26 : 08:24 PM

ठाणे शिंदेंचेच! उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा, शिंदेसेनेला किती जागा?

TMC Election 2026: ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रात्री आठ वाजेपर्यंतच्या निकालानुसार १३१ जागांचे कल समोर आले असून, शिंदेसेनेने ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. २८ जागांवर भाजपा असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही ११ जागा जिंकत शहरात अस्तित्व टिकवून ठेवले आहे. उद्धवसेना १ आणि इतर पक्षांचे ६ उमेदवार आघाडीवर आहेत. 

16 Jan, 26 : 06:20 PM

Thane Municipal Election Results 2026: राजन विचारे यांच्या पत्नीचा पराभव

माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणूक लढवत होत्या. त्यांचा प्रभाग क्रमांक १२ मधून पराभव झाला आहे. उद्धवसेनेकडून नंदिनी राजन विचारे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. 

16 Jan, 26 : 05:21 PM

NMC ELection 2026: एकनाथ शिंदे की गणेश नाईक, नवी मुंबईत कुणाचा कार्यक्रम झाला?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली. त्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या निकालाची जास्त उत्सुकता होती. या महापालिका निवडणुकीत गणेश नाईक शिंदेंना रोखण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. 

महापालिकेच्या १११ जागांपैकी ६६ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर शिंदेसेनेला ४२ जागा जिंकण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उद्धवसेनेचा दोन जागांवर विजय झाला असून, मनसेच्या खात्यात एक जागा आली आहे. 

16 Jan, 26 : 03:53 PM

एकनाथ शिंदेंच्या प्रभागात उद्धवसेनेने उधळला गुलाल; कोणाचा पराभव, कोण जिंकले?

ठाणे महापालिका निवडणुकीत एका निकालाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतात त्या प्रभागात शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. 

माजी महापौर अशोक वैती यांचा उद्धवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला आहे. उद्धवसेनेचे शहाजी खुपसे हे ६६७ मतांनी विजयी झाले आहेत. 

16 Jan, 26 : 02:40 PM

TMC Election Results 2026: ठाण्यात शिंदेंसेनेची मुसंडी; भाजपा, उद्धवसेनेचे काय झाले?

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कायम असल्याचे महापालिका निवडणुकीच्या निकालातून दिसत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या १३१ जागांपैकी ५२ जागांचे निकाल हाती आले असून त्यात शिंदेसेनेने मुसंडी मारली आहे. शिंदेसेना २४ जागांवर विजयी झाली आहे. त्यात भाजपाला १२, तर उद्धवसेनेचे ५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या खात्यात १ जागा आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. 

16 Jan, 26 : 02:11 PM

Ulhasnagar Municipal Election Result 2026: उल्हासनगरमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर

उल्हासनगर महापालिकेच्या निकालात भाजपाने मुसंडी मारली आहे. आतापर्यंत २४ जागांचा निकाल हाती आला असून, त्यात १३ जागा जिंकल्या आहेत. दुसऱ्या स्थानी शिंदेसेना असून, ११ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), मनसे यांना खातेही उघडता आलेले नाही. 

16 Jan, 26 : 01:38 PM

गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचा निकाल काय, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने?

मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रचंड चर्चेत राहिली. भाजपाचे गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याबद्दल याची उत्सुकता होती. निकालामध्ये नवी मुंबईवरील गणेश नाईकांची पकड कायम असल्याचे दिसत आहे. 

दुपारी दीड वाजेपर्यंतच्या कलानुसार, भाजपाने ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. शिंदेसेनेला २८ जागांवर आघाडीवर आहे. उद्धवसेनेला २ जागांवरच आघाडी घेता आली आहे. 

16 Jan, 26 : 01:18 PM

KDMC Election Results Live: कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदेसेना सुसाट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे ताजे निकाल हाती आले आहेत. एकूण १२२ जागांपैकी भाजपला २० जागा मिळाल्या, असून शिवसेनेला १८ जागांवर यश मिळाले आहे. तर मनसे-ठाकरेसेनेला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.

16 Jan, 26 : 12:40 PM

TMC Election 2026: ठाण्यात शिंदेसेनेच्या ४ उमेदवारांचा दमदार विजय

ठाणे प्रभाग १९ मधील शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार विजयी झाले. मीनल संख्ये (१५९७९), नम्रता भोसले (१७२२४), विकास रेपाळे (१७२३५), राजेंद्र फाटक (१७०१९) हे चार उमेदवार विजयी झाले.

16 Jan, 26 : 12:37 PM

TMC Election 2026: ठाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खाते उघडले. प्रभाग १० मधील नजीब मुल्ला, पूनम माळी, वहिदा खान, सुहास देसाई हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

16 Jan, 26 : 12:34 PM

KDMC Election Results Live: कल्याण डोंबिवलीत ठाकरेसेनेच्या दोन उमेदवारांची मुसंडी

कल्याण डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाने दमदार कामगिरी केल्याचे दिसतेय. महायुतीने चांगली सुरुवात केली होती पण आता ठाकरेसेनाही दमदार आगेकूच करताना दिसत आहेत.

16 Jan, 26 : 11:46 AM

TMC Election Results Live: ठाण्यात मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद

ठाण्यात मतमोजणी सुरु असताना गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. जोशी बेडेकर कॉलेज येथील केंद्रावर अपुऱ्या सुविधा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातला. पाहा व्हिडीओ- 

16 Jan, 26 : 11:09 AM

TMC Election Results Live: ठाण्यात शरद पवार गटाचे ४ उमेदवार आघाडीवर

ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा गड मानला जातो, पण येथे थोडेसे वेगळे चित्र दिसत आहे.

16 Jan, 26 : 11:02 AM

NMMC Election Results Live: २० प्रभागांची मतमोजणी सुरू, १५ ठिकाणी भाजप आघाडीवर

नवी मुंबई: २० प्रभागांची मतमोजणी सुरू, १५ ठिकाणी भाजप आघाडीवर, ५ ठिकाणी शिंदेसेना आघाडीवर; माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनवणे आघाडीवर

16 Jan, 26 : 10:50 AM

NMMC Election Results Live: मतमोजणीला सुरूवात, भाजप-शिवसेनेत 'टफ-फाईट'

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बॅलेट पेपर मतमोजणीला सुरुवात. सुरुवातीच्या कलानुसार, भाजप २ आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर. येथे टफ-फाईट होण्याची शक्यता.

16 Jan, 26 : 10:34 AM

TMC Election Results LIVE: ठाण्यात मतमोजणीला उशीर; केंद्रावर प्रतिनिधी प्रवेशाला सुरुवात

ठाणे महानगरपालिकेत मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार होती, पण काही कारणाने मतमोजणीला उशीर झाला. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू आहे.

16 Jan, 26 : 09:56 AM

TMC Election Results LIVE: ठाण्यात मतदानाआधीच शिंदेसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी

ठाणे महानगरपालिका ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. येथील १३१ जागांपैकी मतदानाआधीच ६ जागांवर शिंदेसेनेने बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे येथे शिंदेसेना वरचढ ठरेल असा अंदाज लावला जात आहे.

16 Jan, 26 : 09:56 AM

KDMC Election Results Live: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच भाजप-शिंदसेनेची सरशी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदानाआधीच १२२ जागांपैकी २१ जागा भाजप-शिवसेना महायुतीने बिनविरोध जिंकल्या. यापैकी १५ जागा भाजप तर ६ जागा शिंदेसेनेच्या आहेत. त्यामुळे आता ६२ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीला ४१ जागांची गरज आहे.

16 Jan, 26 : 09:00 AM

नाईक विरूद्ध शिंदे... नवी मुंबई कुणाची?

नवी मुंबई महानगरपालिकेच्या २८ प्रभागांत १११ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. एकूण ५०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. नवी मुंबईत नाईक विरूद्ध शिंदे अशी थेट लढत आहे. गेल्यावेळी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४८ टक्के मतदान झाले होते.

16 Jan, 26 : 08:57 AM

कल्याण-डोंबिवलीत कुणाला सत्ता?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांत १२२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. एकूण ४८८ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. गेल्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ४५ टक्के मतदान झाले होते. यावेळी या टक्केवारीत घट पाहायला मिळाली आहे.

16 Jan, 26 : 08:51 AM

ठाण्यात ६४९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

ठाणे महानगरपालिकेसाठी एकूण ३३ प्रभागात १३१ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. एकूण ६४९ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. गेल्यावेळी ठाण्यात ५८ टक्के मतदान झाले होते. यावेळी यात काहीशी घट झाल्याचे चित्र आहे.

Web Title: TMC NMMC KDMC Municipal Election Results 2026 LIVE Updates Thane Navi Mumbai and Kalyan-Dombivli Mahanagar Palika Nikal in Marathi Ward-Wise Winners list latest News