कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:58 IST2019-10-20T01:57:54+5:302019-10-20T01:58:11+5:30

कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी दुर्गाडी चौकातून भव्य रॅली काढली.

Shiv Sena rally in Kalyan West | कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काढली रॅली

कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काढली रॅली

कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी दुर्गाडी चौकातून भव्य रॅली काढली. यावेळी भोईर यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या प्रचाररॅलीत दुचाकी, रिक्षा, मोटार घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. प्रचारातील वाहनांची रांग तीन किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत लागली होती.

दरम्यान, आतापर्यंत भोईर यांना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारीवर्ग, ज्येष्ठ नागरिक संघ, ब्राह्मण ज्ञाती समाज, भोई कोळी ज्ञाती समाज, गॅस एजन्सी कर्मचारी, रिक्षाचालक संघटना, अखिल खान्देश सेवा संघाने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भोईर यांचा वचननामा उर्दू भाषेत भाषांतरित करून मुस्लिमबांधवांनी त्याचे मुस्लिम मोहल्ल्यात वाटप केले. तसेच शुक्रवारच्या नमाजपठणानंतर मोहल्ल्यातील मुस्लिमबांधवांच्या गाठीभेटी भोईर यांनी घेतल्या.

Web Title: Shiv Sena rally in Kalyan West