घाडगे & सूनमध्ये अमृता मागणार का चित्राची माफी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:40 IST2019-09-18T16:27:26+5:302019-09-18T16:40:16+5:30
Ghadge & Suun Update : अनेक विघ्न, अडचणीनंतर अखेर अमृता आणि अक्षयचा लग्न सोहळा पार पडला आणि अमृता घाडगे सदनमध्ये सून म्हणून आली

घाडगे & सूनमध्ये अमृता मागणार का चित्राची माफी ?
अनेक विघ्न, अडचणीनंतर अखेर अमृता आणि अक्षयचा लग्न सोहळा पार पडला आणि अमृता घाडगे सदनमध्ये सून म्हणून आली आणि अक्षय – अमृतचा नवा प्रवास सुरू झाला. अमृता आणि अक्षयचा सुखाचा संसार सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. पण अमृतासोबतच घाडगे सदनमध्ये चित्रा देखील सून म्हणून आली. चित्राचा घाडगे सदनमध्ये येण्या मागचा हेतु माई आणि अमृता वा घरातील कुठल्याच सदस्याला अजून माहिती नाहीये... चित्रा अनंतची बायको म्हणून घरामध्ये यावी हा अमृताचा निर्णय वसुधाला मात्र पटलेला नसून यामुळे वसुधा अमृतावर नाराज आहे. आणि तिची नाराजगी तिने परिवारासमोर व्यक्त देखील केली. आता चित्राच्या घरामध्ये येण्याने कुठले नवे संकट परिवरावर येणार ? हे हळूहळू कळेलच... चित्राचा डोळा घाडगेंच्या संपत्तीवर आहे आणि ते मिळविण्यासाठी ती आता काय काय कारस्थान रचेल आणि माई - अमृता याला कशा सामोर्या जातील त्यावर कशी मात करतील ? हे बघणे रंजक असणार आहे... घरामध्ये आनंदाचे वातावरण असतानाच त्यामध्ये चित्रा मिठाचा खडा टाकणार आहे.
अक्षय आणि अनंतच्या लग्नानंतर माई घरामध्ये पूजा ठेवणार आहेत... या पूजेदरम्यान असे काय घडले, वा चित्राने असे काय केले ज्यामुळे माईंनी अमृताला चित्राची माफी मागायला सांगितली ? नात्यामध्ये फूट पाडण्याच्या हेतूमध्ये चित्रा यशस्वी होईल ? की अमृताला चित्राचा हेतू कळेल.