Taarak Mehta ka Ooltah Chashmah Dilip Joshi aka Jethalal throwback pictures | जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण!

जेठालाल ऊर्फ दिलीप जोशीने शेअर केला ३७ वर्ष जुना फोटो, ओळखणंही झालं कठिण!

'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील सर्वात मुख्य आणि सर्वात लोकप्रिय भूमिका जेठालालच्या कॉमेडीचे सर्वच फॅन आहेत. नेहमीच ही भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांचं फॅन्सकडून भरभरून प्रेम केलं जातं. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा मालिकेचं शूटींग सुरू झालंय. अशात दिलीप जोशीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केलाय. ज्यात त्यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळतोय. इतकेच काय तर त्यांना ओळखणंही कठिण होतंय.

37 वर्ष जुना फोटो

जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी जो फोटो शेअर केलाय तो फारच जुना आहे. त्यांनी या फोटोबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहितीही दिली आहे. त्यांनी लिहिले की, कुणीतरी म्हणालं की, थ्रोबॅक थर्सडे सुरू आहे. त्यामुळे मी हा फोटो शेअर करत आहे.

पृथ्वी थिएटरच्या आठवणी

दिलीप जोशी यांनी लिहिले की, हा फोटो १९८३ मधील आहे. जुहूमध्ये महान पृथ्वी थिएटरची ग्रीन रूम, जिथे मी आमच्या 'खेलइया' नाटकाच्या शोआधी हा फोटो क्लिक केला होता. याच्याशी संबंधित अनेक आठवणी आहेत. नाटक मंडळीच्या सदस्यांसोबतच्या अनेक आठवणी आहेत. खासकरून चंदू भाई, परेश भाई आणि अजीज महेंद्र जोशी.

दिलीप जोशी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्हीही फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाइट आहेत. पहिल्या फोटो दिलीप जोशी कमाल दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत त्यांचा स्टायलिश लूक आहे. डोक्यावर हॅट, दाढी, जीन्सची जॅकेट, शर्टाची बटन उघडलेली एकदम काउबॉय लूक दिसत आहे.

हे पण वाचा :

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...! 

अखेर तो क्षण लवकरच येणार, दयाबेनची दणक्यात एन्ट्री होणार!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta ka Ooltah Chashmah Dilip Joshi aka Jethalal throwback pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.