Farewell to the audience who will take this popular series on Zee Marathi, you too will be shocked to read the name | झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का


झी मराठीवरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. यात माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, रात्रीस खेळ चाले 2 आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मनं जिंकली आहेत. या पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार असल्याची माहिती मिळते आहे. 'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद भाग २ ला देखील दिला आहे. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी 'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रात्रीस खेळ चाले २' मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली होती. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत होती आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. तसेच दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांची खूप दाद मिळाली. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.


'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवट पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे अण्णा जगाचा निरोप घेताना दिसणार आहे. पण, कसा हे पाहणे रंजक असणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट पासून 'देवमाणूस' ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे. ही मालिका १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'देवमाणूस' ही एक थ्रिलर मालिका असणार आहे.  या मालिकेत लागीरं झालं जीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच शिवानी घाटके देखील या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Farewell to the audience who will take this popular series on Zee Marathi, you too will be shocked to read the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.