​रुपाली भोसलेला आकर्षित करण्यासाठी सुमीत राघवन आणि राजेश कुमारमध्ये जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 05:17 PM2016-10-24T17:17:39+5:302016-10-24T17:17:39+5:30

बडे दूर से आये है या मालिकेत रुपाली भोसले, सुमित राघवन, राजेश कुमार आपल्याला प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळत ...

Sumit Raghavan and Jugalbandi in Rajesh Kumar to attract Rupali Bhosali | ​रुपाली भोसलेला आकर्षित करण्यासाठी सुमीत राघवन आणि राजेश कुमारमध्ये जुगलबंदी

​रुपाली भोसलेला आकर्षित करण्यासाठी सुमीत राघवन आणि राजेश कुमारमध्ये जुगलबंदी

googlenewsNext
े दूर से आये है या मालिकेत रुपाली भोसले, सुमित राघवन, राजेश कुमार आपल्याला प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत दुसऱ्या ग्रहावरून आलेले घोटाला कुटुंब प्रेक्षकांना खळखळून हसवते. यात सुमित आणि रुपाली हे दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. नुकत्याच त्या दोघांनी सब की दिवाळी या कार्यक्रमात एक नृत्य सादर केले. या नृत्याला सगळ्यांनीच दाद दिली. या कार्यक्रमात सुमीत, राजेश आणि रुपाली यांनी पडोसन या चित्रपटातील एक चतुर नार या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. या नृत्याविषयी रुपाली सांगते, "या गाण्याचे चित्रीकरण करताना आम्हाला खूप मजा आली. आम्ही परफॉर्मन्सच्या तालमीच्यावेळीदेखील खूप एन्जॉय केला होता. पडोसन हा चित्रपट अनेकजणांना आवडतो. या चित्रपटातील हे गाणेदेखील रसिकांचे आवडते आहे. त्यामुळे आमचे नृत्या पाहाताना या चित्रपटाच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल. या गाण्यात दौलतराम माझ्यासोबत फ्लर्टिंग करतो. त्यावेळी एक पझेसिव्ह नवऱ्याप्रमाणे वसंत त्याला माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते दोघेही माझ्यासाठी या गाण्यात भांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा परफॉर्मन्स सादर केला, तो क्षण माझ्यासाठी खूप मजेशीर होता." 
सुमीत आणि राजेश यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बडे दूर से आये है या मालिकेत पाहायला मिळत आहे. पण याआधीदेखील ते दोघे साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेत झळकले होते. या मालिकेत सुमीतने साहिल तर राजेशने रोसेश ही भूमिका साकारली होती. 

Web Title: Sumit Raghavan and Jugalbandi in Rajesh Kumar to attract Rupali Bhosali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.