"माझ्यासोबत नसली तरीही तिच्या डोळ्यांत अश्रू...", शिव ठाकरेचं वीणा जगतापबद्दल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 18:53 IST2023-07-21T18:52:24+5:302023-07-21T18:53:32+5:30

शिव ठाकरेने वीणा जगतापबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "दोन व्यक्तींमधल्या काही गोष्टी..."

shiv thakare talk about ex girlfriend veena jagtap said i cant see tear in her eyes | "माझ्यासोबत नसली तरीही तिच्या डोळ्यांत अश्रू...", शिव ठाकरेचं वीणा जगतापबद्दल वक्तव्य

"माझ्यासोबत नसली तरीही तिच्या डोळ्यांत अश्रू...", शिव ठाकरेचं वीणा जगतापबद्दल वक्तव्य

मराठमोळा शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी १२'मुळे चर्चेत आहे. रोडीजमुळे प्रसिद्धीझोतात आलेला शिव 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉस मराठीच्या घरातील शिव आणि अभिनेत्री वीणा जगतापची जोडी प्रचंड गाजली. परंतु, नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. 'बिग बॉस हिंदी'च्या नुकत्याच पार पडलेल्या पर्वातही शिव सहभागी झाला होता. 

'बिग बॉस हिंदी'च्या घरात असतानाही शिव आणि वीणाबद्दल बाहेर चर्चा होत होत्या. यावर आता शिवने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. शिव बिग बॉसमध्ये असताना त्याच्या आईने वीणाबद्दल वक्तव्य केलं होतं. "बिग बॉसच्या घरात असताना तुझ्या आईचे काही इंटरव्ह्यू व्हायरल झाले होते. वीणाचा विषयही निघाला होता. उगाच कोणाचं तरी नाव मध्ये आले असं वाटतं का?" असा प्रश्न शिवला विचारला गेला. यावर उत्तर देत तो म्हणाला, "उगाच कोणत्याही गोष्टी होत नाहीत. भूतकाळातील काही बॉण्ड माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते बॉण्ड तुम्ही पुढे कसे जपता, हे तुमच्यावर आहे." 

"तुझ्यासारखा मित्र कोणालाही मिळू नये", कुशल बद्रिकेबद्दल श्रेया बुगडे असं का म्हणाली?

"हा सिनेमा तुम्हाला खोऱ्याने पैसे...", 'बाईपण भारी देवा'बाबत सुकन्या मोनेंच्या आईने केलं वक्तव्य

"तो बॉण्ड, ते रिलेशन तुमच्या फॅमिलीचं नव्हतं. दोन व्यक्तींमधल्या काही गोष्टी कुटुंबीयांना माहीत नसतात. त्या लोकांनाही माहीत नसतात. त्या गोष्टी फक्त दोघांना माहीत असतात. मी माझ्या पद्धतीने त्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केल्या. रिएलिटी शोमध्ये हे होऊ शकतं, याची मला कल्पना होती. त्यामुळे त्या बॉण्डसाठी मी उभा राहीन, हे मी आधीच ठरवलं होतं. मी आतापर्यंत ते नातं जपत आलो आहे. त्यामुळे ते कसं जपायचं, याबाबत मला कल्पना आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी मोठी नव्हती. माझ्यासोबत नसली तरीही त्या व्यक्तीच्या डोळ्यांत मला अश्रू नको आहेत. त्यामुळे मी त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या," असंही पुढे शिव म्हणाला. 

Web Title: shiv thakare talk about ex girlfriend veena jagtap said i cant see tear in her eyes