"हा सिनेमा तुम्हाला खोऱ्याने पैसे...", 'बाईपण भारी देवा'बाबत सुकन्या मोनेंच्या आईने केलं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:37 PM2023-07-21T17:37:16+5:302023-07-21T17:37:59+5:30

'बाईपण भारी देवा' चित्रपटाबाबत सुकन्या मोनेंच्या आईने केलेलं वक्तव्य, अभिनेत्रीचा खुलासा

baipan bhari deva will give to lot of money said actress sukanya mone mother | "हा सिनेमा तुम्हाला खोऱ्याने पैसे...", 'बाईपण भारी देवा'बाबत सुकन्या मोनेंच्या आईने केलं वक्तव्य

"हा सिनेमा तुम्हाला खोऱ्याने पैसे...", 'बाईपण भारी देवा'बाबत सुकन्या मोनेंच्या आईने केलं वक्तव्य

googlenewsNext

'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या मनाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवरही याच चित्रपटाचं अधिराज्य आहे. अवघ्या २० दिवसांत बाईपण भारी देवा चित्रपटाने ५७ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून कलाकार आणि दिग्दर्शकही भारावून गेले आहेत. पण, हा चित्रपट चांगली कमाई करेल असं सिनेमातील अभिनेत्रीच्या आई म्हणाल्या होत्या. 

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या आईने 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या यशाबद्दल वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. "हा चित्रपट तुम्हाला खोऱ्याने पैसे मिळवून देणार असं माझी आई म्हणाली. आईचा आशीर्वाद मिळाला. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. हे यश प्रेक्षकांनी दिलेलं आहे. मी ४०-४२ वर्ष काम करत आहे. पण फक्त कुसुम मनोहर लेलेला कधीतरी हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. पण, इथे महाराष्ट्रासह इतर राज्यांत याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्येही चित्रपटाचे शो वाढवले जात आहेत. रत्नागिरी, चिपळूणसारख्या ठिकाणी चार-चार शो हाऊसफूल होत आहेत. एका कलाकाराला यापेक्षा अजून काय हवं," असं सुकन्या मोने यांनी सांगितलं. 

"हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरुन हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..."

"तुझ्यासारखा मित्र कोणालाही मिळू नये", कुशल बद्रिकेबद्दल श्रेया बुगडे असं का म्हणाली?


'बाईपण भारी देवा' चित्रपटातून सहा बहिणींची अनोखी गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात सुकन्या मोनेंनी काकडे सिस्टर्सपैकी एक असलेल्या साधनाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सुकन्या मोनेंसह या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

Web Title: baipan bhari deva will give to lot of money said actress sukanya mone mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.