चाहत्यांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला, शहनाज गिलच्या अंगलट आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:30 PM2021-04-27T13:30:38+5:302021-04-27T15:55:09+5:30

‘बिग बॉस 13’मुळे (Bigg Boss 13) शहनाज गिल (Shehnaaz Gill) कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.

Shehnaaz gill got trolled for mask on her latest photos | चाहत्यांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला, शहनाज गिलच्या अंगलट आला

चाहत्यांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला, शहनाज गिलच्या अंगलट आला

googlenewsNext

बिग बॉस 13’मुळे (Bigg Boss 13)  शहनाज गिल (Shehnaaz Gill) कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर शहनाज खूपच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. शहनाजला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. शेहनाज आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही आधीपेक्षी अधिक सजग बनली आहे. शहनाजने एक दोन नाही तर तब्बल 12 किलो वजन कमी केलं आहे. शहनाज तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

काही तासांपूर्वी शहनाज गिल (Shehnaaz Gill)ने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाज गिल खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यानतर तिची तुलना चाहत्यांनी बार्बी डॉलशी केली आहे. चाहते या फोटोंवर जोरदार कमेंट्स करतायेत. शहनाज गिलने हे फोटोशूट  शेअर करत लोकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. शहनाज गिल म्हणते की, आपण घराबाहेर पडलात तर मास्क नक्की लावा. 


 
शहनाज गिलने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागाला आहे. ट्रोलर्स म्हणतात की, 'आधी स्वत: चा मास्क लावा ...' ट्रोलर्स असेही म्हणतात की लाईक्स मिळवण्यासाठी शहनाज काहीही करण्यास तयार आहे, पण त्याआधी तिने स्वत:च्या अंतर्मनाला प्रश्न विचारावा. 

शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल इंडस्ट्रीत काम केले आहे. शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट ‘काला शाह काला’मध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे. शहनाज अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. लवकरच शहनाज पुन्हा एकदा सिद्धार्थ शुक्लासोबत 'हॅबिट' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे.
 

Web Title: Shehnaaz gill got trolled for mask on her latest photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.