सोशल मीडिया सेन्सेशन सपना चौधरीने पहिल्यांदाच शेअर केला मुलासोबतचा फोटो, फॅन्सकडून लाइक्सचा पाऊस....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 09:03 IST2020-12-16T09:01:16+5:302020-12-16T09:03:21+5:30

सपनाची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. तिचे फॅन्स तिच्या या फोटोवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

Sapna Choudhary shares her picture with son on social media | सोशल मीडिया सेन्सेशन सपना चौधरीने पहिल्यांदाच शेअर केला मुलासोबतचा फोटो, फॅन्सकडून लाइक्सचा पाऊस....

सोशल मीडिया सेन्सेशन सपना चौधरीने पहिल्यांदाच शेअर केला मुलासोबतचा फोटो, फॅन्सकडून लाइक्सचा पाऊस....

फेमस हरयाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरने जवळपास २ महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. सपना चौधरीने पहिल्यांदाच आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सपनाची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. तिचे फॅन्स तिच्या या फोटोवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत. तसेच फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट्सही करत आहेत.

सपना चौधरीने वेगळ्याच शायराना अंदाजात हा फोटो शेअर केलाय. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ''हज़ारों साल नर्गिस अपनी बेनूरी पे रोती है. बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा।'. या फोटोत सपनाने तिच्या बाळाला कडेवर घेतलं आहे.

दरम्यान सपना चौधरीने याच वर्षी जानेवारीमध्ये हरयाणवी गायक, रायटर आणि मॉडल वीर साहूसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. सपना आणि वीरबाबत त्यांच्या फॅन्सना फार उशीरा समजलं होतं. लग्न झालं तेव्हाच ही बातमी समोर आली होती. तशी तर सपना हरयाणा आणि पश्चिम यूपीमध्ये आधीच फेमस होती. पण टीव्हीवरील 'बिग बॉस' मध्ये येऊन गेल्यावर ती देशभरात फेमस झाली.
 

Web Title: Sapna Choudhary shares her picture with son on social media