OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 12:15 IST2020-08-29T11:44:46+5:302020-08-29T12:15:13+5:30

बिग बॉस 14साठी सलमान खानने केलेले प्रोमोशूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Salman khan charges rs 250 crore for bigg boss 14 show on air from october | OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार

OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार

बिग बॉस 14 ची तयारी जोरात सुरू झाली आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही सलमान खान शोमध्ये आपल्या दमदार अंदाजात दिसणार आहे. बिग बॉस 14साठी सलमान खानने केलेले प्रोमोशूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सलमानला बिग बॉसच्या होस्टिंगसाठी भारी भक्कम रक्कम मिळाली आहे. 

सलमान खान करणार बिग बॉस 14चे सूत्रसंचालन  
 रिपोर्टनुसार, बिग बॉस 14चे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमानला 250 कोटी दिले आहेत. सलमान आठवड्यातून एकदा शोच्या दोन भागांसाठी शूटिंग करणार आहे. 12 आठवड्यांसाठी सलमानला प्रत्येक भागासाठी 10.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत.  म्हणजे एका आठवड्यात दोन भागांसाठी सलमानला 20.50 कोटी रुपये मिळतील.


ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बिग बॉस 14 सुरु होणार

सुरुवातीला सप्टेंबरच्या शेवटी हा शो सुरु होणार होता, मात्र आता याला सुरु व्हायला उशीर होणार असे दिसतेय. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये बिग बॉसचे घर तयार करण्यात येतं आहे पण सातत्याने होणाऱ्या पावसामुळे यात व्यत्यय येतेय. पाऊस थांबल्यावर  बिग बॉसचे घर बांधण्याचे काम वेगाने सुरू होईल.
 

Web Title: Salman khan charges rs 250 crore for bigg boss 14 show on air from october