'रंग माझा वेगळा' फेम हर्षदा खानविलकरची बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पहा कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:00 AM2021-07-11T07:00:00+5:302021-07-11T07:00:00+5:30

हर्षदा खानविलकर ही एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

'Rang Mazha Vegla' fame Harshda Khanwilkar's sister also famous actress. Look who is this? | 'रंग माझा वेगळा' फेम हर्षदा खानविलकरची बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पहा कोण आहे ही?

'रंग माझा वेगळा' फेम हर्षदा खानविलकरची बहीण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पहा कोण आहे ही?

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कार्तिक, दीपा, सौंदर्या अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत सौंदर्याची भूमिका साकारक आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर. हर्षदा खानविलकर बऱ्याच वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत आहेत. पण हर्षदा खानविलकर ही एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर जाणून घेऊया हर्षदा खानविलकर हिच्या बहिणीबद्दल.

अभिनेत्री हर्षदा खानविलकर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडेची बहिण आहे. तसेच अभिनेत्री मृणाल देशपांडे अभिनेत्री समिधा गुरूची थोरली बहिण आहे हे देखील लोकांना माहित नाही. समिधा गुरू सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेत ऐश्वर्याची भूनमिका साकारते आहे. या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. मग, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मृणाल देशपांडे आणि समिधा गुरू या सख्ख्या बहिणी आहेत तर मग हर्षदा खानविलकर कोण? तर हर्षदा खानविलकर मृणाल देशपांडेची मानलेली बहिण आहे.


काही दिवसांपूर्वीच मृणाल देशपांडेने सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत ती बहिण हर्षदा खानविलकरसोबत दिसून आली.

अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. हर्षदाचा यंदाचा वाढदिवस दोघी बहिणींनी एकत्रित साजरा केला. या दोघींनी यापूर्वी ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले आहे.

या मालिकेच्या दरम्यान हर्षदा आणि मृणाल या दोघींमध्ये अगदी स्पेशल नाते बनत गेले. हे नाते पुढे आणखी घट्ट होत गेले की त्याचे रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झाले.

Web Title: 'Rang Mazha Vegla' fame Harshda Khanwilkar's sister also famous actress. Look who is this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.