ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत राखी खूपच उदास दिसते आहे. राखीला पाहून तुला प्रेमात धोका मिळाला असंच वाटतंय. राखीने खूप साऱ्या दु:खी गाण्याची व्हिडीओ पोस्ट केले आहेत.


नेहमी आनंदी आणि बिनधास्त असणारी राखी  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट करतेय. या सगळ्या व्हिडीओमध्ये राखी उदास दिसतेय. एक व्हिडीओत राखी रडताना दिसतेय. सतत उदास व्हिडीओ शेअर केल्याने राखीचे फॅन्स देखील हैराण झाले आहेत. त्यांनी तिला उदास होण्यामागचे कारण विचारले आहे. 


राखीच्या लग्नाला एक महिना झाला आहे तर लगेच घटस्फोटाच्या बातम्या समोर येतायेत. राखीचा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला असे तिने सांगितले होते. तिच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू होती.

ती पूर्ण झाली की, तीही तिकडे जाणार होती.  असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.  29 जुलैला 2019ला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.
 


Web Title: Rakhi sawant posted sad videos on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.