Nia Sharma birthday professional front Reyhna pandit kissing public | चारचौघात चक्क एका अभिनेत्रीला Kiss करून चर्चेत आली होती निया, म्हणाली होती...

चारचौघात चक्क एका अभिनेत्रीला Kiss करून चर्चेत आली होती निया, म्हणाली होती...

आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री निया शर्माचा आज वाढदिवस. नियाच्या कामासोबतच तिच्या बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते. निया शर्मा ही २०१६ मध्ये आशियातील तिसरी आणि २०१७ मध्ये दुसरी सर्वात सेक्सीएस्ट वुमन होती.

निया शर्मा २०१९ मध्ये तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. तिचा अभिनेत्री रेहना पंडितसोबतचा पब्लिकमध्ये लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने सर्वांनाच धक्का बसला होता. कारण हा प्रकार सर्वांसमोर करण्यात आला होता. निया शर्मा आणि रेहना पंडीत यांच्यात स्पेशल बॉन्ड आहे. किसींग व्हिडीओवर रेहना पंडीत आणि नियाने रिअॅक्शन दिली होती.

बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना रेहना म्हणालली होती की, 'माझ्या बहिणीनंतर मी जर कुणावर प्रेम करत असेल तर ती निया आहे. कारण ती माझ्या बहिणीसारखी आहे. मला आश्चर्य वाटतंय की, या गोष्टीला इतकी हवा का दिली जात आहे. मला इतकंच सांगायचंय की, निया माझी इंडस्ट्रीतील सर्वात चांगली आणि एकमेव मैत्रीण आहे. त्या पार्टीमध्ये मी उशीरा आल्याने निया चिंतेत होती. तर मी विचार केला की, किस करून तिला प्रेम देऊ. नियासाठी ते माझं प्रेम होतं. तो लेस्बियन अॅक्ट अजिबात नव्हता'.

निया रेहनाच्या मुद्द्यावर सहमती दर्शवत म्हणाली होती की, ' एका साध्या गोष्टीला मोठं केलं जात आहे. याचा इश्यू करा नका. लोकांना हे समजलं पाहिजे. आम्ही ट्रोलर्सना कंट्रोल करू शकत नाही. आम्हा दोघींना हे माहीत आहे की, ते आमचं एकमेकींसाठी प्युअर प्रेम होतं. रेहना माझ्या बहिणीसारखी आहे. आम्ही पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. माझं तिच्यासोबत प्रेमाचं नातं आहे'.

नियाच्या कामाबाबत सांगायचं तर निया शर्माने २०१० मध्ये 'काली एक - अग्नी परीक्षा' मालिकेतून डेब्यू केलं होतं. नियाला खरी ओळख मिळाली ती 'एक हजारों में मेरी बहना है' मालिकेतून. से मिली. २०११ मध्ये ही मालिका सुरू झाली होती आणि २०१३ मध्ये संपली होती. त्यानंतर निया जमाई राजा मालिकेत दिसली होती. यातील तिची भूमिका चांगलीच पसंत केली गेली होती. तसेच निया फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी, ट्विस्टेड, इश्क में मरजावां, नागिन 4 आणि फियर फेक्टर: खतरों के खिलाड़ी मेड इन इंडिया मध्येही दिसली होती. निया फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी मेड इन इंडिया ची वीनर राहिली आहे.

'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ?

हॉट आणि बोल्ड निया शर्माने जिंकला 'खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया'चा किताब, बघा फोटोज

SEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा...! निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nia Sharma birthday professional front Reyhna pandit kissing public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.