Nia sharma opts out of salman khan bigg boss 2020 | 'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ?

'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ?

'बिग बॉस 14'ला घेऊन चाहते खूप उत्साही आहेत. ऑक्टोबरमध्ये हा शो सुरु होणार अशी चर्चा आहे. बिग बॉस14 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं देखील समोर आली होती. यात एक नाव टीव्ही अभिनेत्री निया शर्माचे होते. निया शर्माने बिग बॉस14 मधून माघार घेतल्याची चर्चा आहे. 

निया शर्माने सोडले बिग बॉस?
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री निया पहिल्या दिवसापासून बिग बॉसमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत साशंक होती. शोमध्ये  होणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीबाबत नियाला थोडा संकोच आहे. त्यामुळे निया आता बिग बॉसच्या घरात जाणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचे आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. नियाने अलीकडे खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया'चा किताब आपल्या नावावर केला आहे. 

हे कलाकारा दिसणार घरात
 शो चे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. शोचा प्रोमो आधीच रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात यावर्षी राधे माँ, सुंगधा मिश्रा, पर्ल वी पुरी, निशांत मल्कानी, जॅस्मिन भसीन, मानसी श्रीवास्तव, शांती प्रिया, साक्षी चोप्रा,  शिरीन मिर्झा, पवित्रा पूनिया, निखिल चिनप्पा, मिशाल रहेजा, अविनाश मुखर्जी, आकांक्षा पुरी आणि व्हिव्हियन डिसेना यांच्या नावाचा समावेश आहे. 

OMG ! 'बिग बॉस 14' सलमान खानने घेतले 250 कोटी, मेकर्ससोबत झाला हा करार

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nia sharma opts out of salman khan bigg boss 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.