"...पेंग्विन वापरायची काय गरज होती", राज्याच्या राजकारणावरुन शशांक केतकरने केलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:12 PM2023-07-12T18:12:35+5:302023-07-12T18:13:56+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणावरुन शशांक केतकरने केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, शेअर केेलेला फोटो चर्चेत

muramba fame actor shashank ketkar shared criptic post on maharashtra politics | "...पेंग्विन वापरायची काय गरज होती", राज्याच्या राजकारणावरुन शशांक केतकरने केलेली पोस्ट चर्चेत

"...पेंग्विन वापरायची काय गरज होती", राज्याच्या राजकारणावरुन शशांक केतकरने केलेली पोस्ट चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या मालिकेत 'श्रीरंग गोखले' ही व्यक्तिरेखा साकारुन अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. शशांक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या शशांक त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका बस स्टॉपचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पेंग्विनचं चित्र असून त्यावर "रांगेत चला', असं लिहिलेलं दिसत आहे. या पोस्टला शशांकने "आता मला खरं खरं सांगा…बस स्टॉपवर रांगेत उभे राहा, हे सांगण्यासाठी पेंग्विन वापरायची काय गरज होती," असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. या पोस्टमध्ये शशांकने महाराष्ट्र, पॉलिटिक्स हे हॅशटॅगही दिले आहेत. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

 "योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका मला पटतात", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

"घरभाडं द्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते, पण...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' कटू प्रसंग

शशांकने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेबरोबरच सुखाच्या सरींनी हे मन बावरे, पाहिले न मी तुला या मालिकेतील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: muramba fame actor shashank ketkar shared criptic post on maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.