Mohsin Khan and Shivangi Joshi on TV’s Most Desirable list of 2019 | 2019 च्या ‘मोस्ट डिझायरेबल’ यादीत मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांचा समावेश
2019 च्या ‘मोस्ट डिझायरेबल’ यादीत मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांचा समावेश

मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांनी गेली तीन वर्षे आपल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेतून रसिकांचे मनोरंजन करत आहे.  या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान 2019 च्या ‘मोस्ट डिझायर्ड पुरुषां’च्या यादीत दुसर्‍्या, तर नायराची भूमिका साकारणारी शिवांगी ही ‘मोस्ट डिझायर्ड महिलां’च्या यादीत सहाव्या स्थानावर होती. मालिकेतील या दोघांचे अपूर्व नाते आणि प्रेक्षकांच्या इच्छेनुसार हे स्थान त्यांना देण्यात आले आहे.


या किताबामुळे खूपच आनंदित झालेला मोहसिन खान म्हणाला, “पुरुषांच्या यादीत दुसर्‍्या स्थानावर असल्यामुळे मला माझा गौरव झाल्यासारखं वाटतंय. माझे चाहते आणि प्रेक्षकांमुळे कार्तिक हे नाव घरोघरी पोहोचलं असून नेहमीप्रमाणेच त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यामुळे प्रेक्षकांचं अधिक जोमाने मनोरंजन करावं आणि अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मला मिळते. माझ्या या यशात ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेच्या यशाचा मोठा वाटा आहे. सर्वात फेव्हरेट अभिनेता म्हणून माझी निवड झाल्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे.”


तर  शिवांगी जोशी म्हणाली, “सर्वात  फेव्हरेट  महिलांच्या यादीत माझा समावेश झाल्यामुळे मी अत्यंत आनंदात आहे. माझे चाहते आणि प्रेक्षकांनी माझ्या नायराच्या व्यक्तिरेखेवर प्रेमचा वर्षाव केला आहे. या यादीत समावेश होणं ही मोठी गौरवाची गोष्ट असून प्रेक्षक यापुढेही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरूच ठेवतील, अशी मला आशा वाटते.”
 

English summary :
Mohsin Khan and Shivangi Joshi have entertained audiences from Yeh Rishta Kya Kehlata Hai Serial for the last three years. Mohsin Khan, who played the role of Kartik in this series, was second in the list of 'Most desired Men' of 2019's list, while Shivangi, who played the role of Naira, was ranked sixth on the list of Most desired women list.


Web Title: Mohsin Khan and Shivangi Joshi on TV’s Most Desirable list of 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.