सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:16 IST2022-05-19T13:29:16+5:302022-05-19T14:16:38+5:30
परीला एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी लंडनला रवाना झाली आहे. सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते.

सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath). उत्तम कथानकासह कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच या मालिकेत दररोज काय घडतं हे पाहायला प्रेक्षक आतुर असतात. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. नेहा, परीला एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी लंडनला रवाना झाली आहे. त्यामुळे चौधरी कुटुंबातील प्रत्येक जण परीची काळजी घेत आहेत. परंतु, सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते.
नेहाच्या गैरहजेरीत मिथीला परीची आईसारखी काळजी घेत आहे. अगदी परीला काय हवं, काय नको याच्याकडे जातीने लक्ष देत आहे. मात्र, तरीदेखील सिम्मी तिचे कटकारस्थानं करत आहेत. सिम्मी परीच्या इंजेक्शनमध्ये काही तरी मिक्स करताना दिसतेय.
सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यात सिम्मी परीच्या इंजेक्शनमध्ये काही तरी मिक्स करते. तेच इंजेक्शन यश परीला देतो आणि त्यानंतर परीला चक्कर येते. सिम्मी परीची तब्येत बिघडी असल्याचे नेहाला लंडनला फोन करुन सांगते. परीची तब्येत बिघडल्याचं समजताच नेहा टेन्शनमध्ये येतो आणि लंडनवरून लगेच परत येत असल्याचं सांगते. इथं सिम्मी नेहा परत आल्यावर मोठा धमाका होणार असे बोलताना दिसते. सिम्मीने केलेले सिम्मीने परीच्या जीवाशी केलेला खेळ सगळ्यांसमोर येणार का?, नेहा पॅलेसमध्ये परल्यावर कोणता धमाका होणार?, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.