फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:57 PM2021-09-23T12:57:03+5:302021-09-23T12:57:57+5:30

Bigg boss marathi 3: आता घरात आणखी एक मजेशीर टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील पुरुष सदस्य चक्क स्त्री वेशात पाहायला मिळणार आहेत.

marathi tv show bigg boss marathi 3 dadus orchestra fashion shobhel tula | फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात

फॅशन शोभेल तुला! बिग बॉसच्या घरात पुरुष दिसणार स्त्री वेशात

Next
ठळक मुद्दे'बिग बॉस'च्या घरात दादूस ऑर्केस्ट्रा भरणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व सुरु होऊन अवघे ५ दिवस झाले आहेत. मात्र, केवळ ५ दिवसांमध्ये घरातील स्पर्धकांनी प्रेक्षकांच लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर यंदाच्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगत आहे. हा खेळ सुरु झाल्यापासून घरातील स्पर्धकांना आतापर्यंत दोन टास्क देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता घरात आणखी एक मजेशीर टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील पुरुष सदस्य चक्क स्त्री वेशात पाहायला मिळणार आहेत.

कलर्स मराठीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या नव्या टास्कचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या नव्या टास्कमध्ये घरातील पुरुष चक्क स्त्रियांप्रमाणे साडी नेसून साजशृंगार केलेल्या रुपात दिसून येणार आहे. 

'बिग बॉस'च्या घरात दादूस ऑर्केस्ट्रा भरणार असून फॅशन शोभेल तुला या नावाअंतर्गंत घरातील पुरुष स्पर्धक स्त्री वेशात वावरणार आहेत. विशेष म्हणजे शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे नऊवारी साडीमध्ये दिसून येणार आहेत.

अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

दरम्यान, या नव्या टास्कमध्ये महिला स्पर्धकदेखील सहभागी होणार असून त्या पुरुष रुपात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. 
 

Web Title: marathi tv show bigg boss marathi 3 dadus orchestra fashion shobhel tula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app