अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:54 AM2021-09-23T11:54:32+5:302021-09-23T11:55:55+5:30

Ashi hi banwa banwi : उत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. या ३३ वर्षांच्या कालावधीत या चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.

interesting facts about marathi movie ashi hi banwa banwi as it completes 33 years | अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

अशी ही बनवाबनवी: त्याकाळी चित्रपटाचं तिकीट किती रुपये होतं माहितीये का?

googlenewsNext
ठळक मुद्देत्याकाळी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफूलचे बोर्ड लागले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'.  २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच ओढीने पाहतात. अभिनेता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे अशी कलाकारांची तगडी फौज या चित्रपटात झळकली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफूलचे बोर्ड लागले होते. त्यामुळेच या चित्रपटाचं त्या काळी तिकीट किती होतं हे आज जाणून घेऊयात. 

उत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. या ३३ वर्षांच्या कालावधीत या चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आज हा चित्रपट ऑनलाइन स्वरुपात सहज पाहायला मिळतो. मात्र, त्याकाळी थिएटरमध्ये जाऊन या कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी मोठ्या पडद्यावर पाहण्याची मज्जा काही औरच होती. म्हणूनच, या चित्रपटाचं त्याकाळचं तिकीट किती असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. 

'स्वत:ची ओळख पुसण्याचं काम'; बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवलीलाचे फॉलोअर्स नाराज
 

प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेलेल्या या चित्रपटाने त्या काळी ३ कोटींचा गल्ला जमवला होता. आजच्या काळात जर हिशोब लावायचं झालं तर हा चित्रपट १०० कोटींच्या घरात पोहोचला होता. त्या काळात हा चित्रपट पाहण्यासाठी पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी जमायची. त्यावेळी प्रभातला फर्स्ट क्लासचं तिकीट ३ रुपये आणि बाल्कनी तिकीट ५ रुपये होते.

दरम्यान, त्यावेळी किरकोळ रुपयांच्या तिकीटावर या चित्रपटाने कोटीच्या कोटीं उडाण्णं घेतली होती. आजही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या मराटी कलाविश्वातील दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे आणि या पुढील अनेक वर्ष त्याची लोकप्रियता कायम राहिल असंच दिसून येतं.
 

Web Title: interesting facts about marathi movie ashi hi banwa banwi as it completes 33 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.