KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

By अमित इंगोले | Published: November 19, 2020 10:59 AM2020-11-19T10:59:27+5:302020-11-19T11:00:29+5:30

योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली.

KBC 12 : Amitabh Bachchan reveals he wrote tons of love letter to Jaya Bachchan | KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

googlenewsNext

कौन बनेगा करोडपती १२ च्या बुधवारी झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या  योगेश पांडे या स्पर्धकाला त्यांच्या जया बच्चन यांच्यासोबतच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला. महाराष्ट्रातील योगेश पांडे याने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अमिताभ यांनी एक खुलासा केला.

योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, लग्नाआधी त्यांनी जया बच्चन यांना शेकडो लव्ह लेटर लिहिली होती. ज्यात त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं. आजही ते जया बच्चन यांना पत्र लिहितात. ते पुढे म्हणाले की, त्यांचे वडील म्हणाले होते की, जर तू जया बच्चनसोबत लग्न करशील तेव्हाच तुला तिच्यासोबत फिरायला जाऊ देणार.

योगशने किती रूपये जिंकले

योगेश पांडे या कौन बनेगा करोडपतीमधून ३ लाख २० हजार रूपये जिंकून गेला योगेशने १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं होतं. त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, फेब्रुवारी २०२० मध्ये कोणता हॉकी खेळाडू 'एफआईएच सेन्स प्लेयर ऑफ द इअर चा पुरस्कार जिंकणार पहिला भारतीय खेळाडू ठरला? 

या प्रश्नाचं योग्य उत्तर मनप्रीत सिंह आहे. योगेशकडे एकच लाइफलाईन शिल्लक होती. याआधी हॉटसीटवर बसून योगेश इमोशनल झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.  

ज्वाला जीत सिंहने जिंकले ३ लाख २० हजार

योगेशआधी हॉटसीटवर यूपीतील ज्वाला जीत सिंह हॉटसीटवर बसले होते. त्यांना १२ लाख ५० हजार रूपयांचा प्रश्न विचारण्यात आला होता. यातील कोणतं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? पर्याय होते A.वूलर झील B.लोकटक झील C.पैंगोंग झील  D.कोलेरू झील

ज्वाला यांच्या सर्व लाइफलाईन आधीच संपल्या होत्या. ज्वालाने अखेर D कोलेरू सरोवर हा पर्याय निवडला होता. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर C पॅंगॉग सरोवर होतं. सीझनच्या दुसऱ्या करोडपती स्पर्धकानंतर ज्वाला जीत सिंह हॉटसीटवर बसले होते.
 

Web Title: KBC 12 : Amitabh Bachchan reveals he wrote tons of love letter to Jaya Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.