ठळक मुद्देकपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोचा टीआरपी या आठवड्यात ढासळला असून हा शो यंदाच्या आठवड्यात थेट आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या सिझन प्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळेल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री होती. पण या कार्यक्रमाला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे टीआरपीच्या अहवालातून दिसून येत आहे.

द कपिल शर्मा या कार्यक्रमाचा टीआरपी या आठवड्यात कमी झाला आहे. फिल्मबीट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, टीआरपी रेसमध्ये एकता कपूरचा कसोटी जिंदगी की 2 हा कार्यक्रम पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनतर कुंडली भाग्य, ये रिश्ता क्या कहलता है, कुल्फी कुमार बाजेवला या कार्यक्रमांचा नंबर लागत आहे.


 
टीआरपीच्या रेस मध्ये पाचव्या क्रमांकावर शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सर 3 हा रिऍलिटी शो आहे. या रेसमध्ये द कपिल शर्मा या कार्यक्रमाला पहिल्या पाच मध्ये देखील जागा मिळवता आलेली नाहीये.

नागीन 3 हा कार्यक्रम नेहमीच पहिल्या पाच मध्ये राहिला आहे. पण आता या कार्यक्रमाचा टीआरपी ढासळला असून हा कार्यक्रम सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सातव्या क्रमांकावर कुमकुम भाग्य या कार्यक्रमाने जागा पटकावली आहे. कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोचा टीआरपी या आठवड्यात ढासळला असून हा शो यंदाच्या आठवड्यात थेट आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तुझे हे राबता आणि ये रिश्ते है प्यार के या मालिका टीआरपी रेस मध्ये नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात दयाच्या भूमिकेत असलेली दिशा वकानी या कार्यक्रमात परत येणार आहे का याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. पण तरीही या कार्यक्रमाला पहिल्या 10 कार्यक्रमात आपले स्थान निर्माण करता आलेले नाहीये.

कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार द कपिल शर्मा शो चा भाग आहेत.  

Web Title: The Kapil Sharma Show rating drops : Latest TV Show TRP Ratings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.