‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 14:56 IST2023-07-15T14:54:57+5:302023-07-15T14:56:20+5:30

प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला 'तो' प्रसंग, म्हणाली, "त्या परिस्थितीतून..."

jassi jaisi koi nahi fame actress mona singh shared casting couch experience | ‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...”

‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...”

छोट्या पडद्यावरील ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून मोना सिंह ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. मोनाने मालिकांबरोबर अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. कफस या वेब सीरिजमधून मोना प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मोनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरुवातीच्या काळात तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रसंगाबद्दल भाष्य केलं.

मोना म्हणाली, “मीदेखील कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. ‘जस्सी जैसी कोई नही’ ही मालिका मिळण्यापूर्वी माझ्याबरोबर हा प्रसंग घडला होता. तेव्हा मी ऑडिशन देण्यासाठी पुण्याहून मुंबईला यायचे. त्यावेळी मी अशा काही लोकांना भेटले...ज्यांच्यामुळे मला भयानक प्रसंगाचा सामना करावा लागला. मी खूप वाईट परिस्थितीत अडकले आहे, याची मला जाणीव झाली होती. यातून बाहेर पडून स्वत:ला कसं वाचवायचं, हाच विचार माझ्या डोक्यात येत होता.”

"कधीही भेटले की मी त्यांना...", रवींद्र महाजनींना 'स्पेशल' नावाने हाक मारायची संजना; लिहिली भावुक पोस्ट

“कोणत्याही वयाची महिला असो, त्यांच्या भावना कधीच चुकीच्या नसतात. जीवनात अशा गोष्टी होत असतात. परंतु, अशा गोष्टी तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यापासून दूर नाही ठेवू शकत. मी अजूनही माझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे केवळ मनोरंजन क्षेत्रात नाही तर इतर ठिकाणी घडत आहे. ही आता पर्सनल चॉइस बनली आहे,” असंही पुढे मोना म्हणाली.

“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा

‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या मोनाने बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात ती झळकली होती.

Web Title: jassi jaisi koi nahi fame actress mona singh shared casting couch experience