Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:10 PM2021-05-21T16:10:46+5:302021-05-21T16:11:47+5:30

Indian Idol 12: आदित्य नारायणने असा काढला चिमटा, प्रोमो पाहून तुम्हालाही बसेल धक्का   

indian idol 12 amit kumar controversy host aditya narayan trolled him on national television | Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

googlenewsNext
ठळक मुद्देदोन आठवड्यांपूर्वी लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती.

अलीकडे ‘इंडियन आयडल 12’च्या (Indian Idol 12) ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वर  प्रचंड टीका झाली होती आणि यानंतर किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांनी शोबद्दल धक्कादायक खुलासा करून खळबळ उडवून दिली होती.  स्पर्धक कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे आहे, असे मला सांगितले गेले होते. जे मला सांगितले तेच मी केले, असा खुलासा अमित कुमार यांनी केला होता. त्यांच्या या खुलाशानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) अमित कुमार यांना खरीखोटी सुनावली होती. मात्र यानंतरही मेकर्सचा अमित कुमार यांच्यावरचा राग कदाचित शांत झालेला नाही. आता आदित्य पुन्हा एकदा अमित कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी एपिसोडमध्ये आदित्य अमित कुमार यांची खिल्ली उडवताना दिसणार आहे. याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला.

नॅशनल टीव्हीवर उत्तर...

‘इंडियन आयडल 12’चा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला़ यात शोचा होस्ट आदित्य नारायण नॅशनल टीव्हीवर अमित कुमार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना दिसतोय. ‘इंडियन आयडल 12’च्या अपकमिंग एपिसोडमध्ये कुमार सानू, अनुराधा पौडवाल व रूप कुमार राठोड गेस्ट म्हणून सहभागी होणार आहेत. प्रोमोमध्ये या एपिसोडमध्ये तिन्ही गेस्ट शोच्या स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतात. हाच धागा पकडून आदित्य नारायण या तिन्ही गेस्टला प्रश्न विचारतो. ‘मी सानू दा, रूप कुमार राठोड व अनुराधाजींना एक प्रश्न विचारू इच्छितो की, त्यांनी मनापासून स्पर्धकांचे कौतुक केले की आमच्या टीमने  करायला सांगितले म्हणून ते कौतुक करताहेत?,’ असे आदित्य म्हणतो.
आदित्य कुमार यावेळी अमित कुमार यांचे नाव घेत नाही़ पण त्याचा इशारा अमित कुमार यांच्याकडे आहे, हे लपून राहत नाही. या प्रोमोवर अमित कुमार काय उत्तर देतात, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.

काय आहे वाद
दोन आठवड्यांपूर्वी लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती. परंतु, या भागावर प्रेक्षकांनी जोरदार टीका केल्यानंतर अमित यांनी देखील कार्यक्रमाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. स्पर्धकांनी किशोर कुमार यांना ट्रिब्यूट दिला होता. परंतु, हा भाग प्रेक्षकांना खास पसंत पडला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमित यांनीही कार्यक्रमाचा हा भाग त्यांना आवडला नसल्याचे म्हटले होते. ‘मला सांगण्यात आले की सगळ्यांचे कौतुक करायचे आहे. मग ते कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे. कारण हा भाग किशोर कुमार यांच्या गाण्यांवर असणार आहे.मी तेच केलं जे मला करण्यासाठी सांगण्यात आले, असे अमित कुमार म्हणाले होते़

Web Title: indian idol 12 amit kumar controversy host aditya narayan trolled him on national television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.