"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:31 PM2023-07-11T12:31:12+5:302023-07-11T12:32:24+5:30

मासिक पाळीबद्दल हेमांगी कवीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "माझ्या गावी..."

hemangi kavi talk about period said menstruation women allowed in home | "आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."

"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."

googlenewsNext

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाटक, मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन हेमांगीने अभिनयाचा ठसा उमटवला. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर  हेमांगी परखडपणे तिची मतं मांडताना दिसते. 

हेमांगीने नुकतीच इसापनीती या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मासिक पाळी या विषयावर भाष्य केलं. हेमांगी म्हणाली, "आमच्या घरी मासिक पाळी पाळली जात नाही, हे सांगताना मला आनंद होत आहे. आणि हे खूप वर्षांपासून सुरू आहे. तुला त्रास होत असेल, तर तू बाजूला बस. पण नाहीतर तू आमच्यात ये...काहीच प्रॉब्लेम नाही. यात काहीच गैर नाही, असा सगळ्यांचा विचार आहे. तुला स्वच्छेने वेगळं बसायचं असेल तर बस. पण, आमच्यात चालतं म्हणून आम्ही जबरदस्तीने तिला घेतही नाही. तुझ्या माहेरी असे संस्कार आहेत, तर ते तू पाळ."  

"केवळ मुंबईत राहतो म्हणून नाही तर हीच लिबर्टी आमच्या गावीही आहे. पूजा आहे म्हणूनही माझ्या आजीने कधी असं सांगितलेलं नाही. लोकांना समजलं तर ते चर्चा करतील, त्यामुळे कोणाला सांगू नकोस, असं माझी आजी सांगायची," असंही पुढे हेमांगी म्हणाली. 

मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

बेधडक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या हेमांगी कवीचा चाहता वर्गही मोठा आहे. हेमांगी सोशल मीडियाद्वारे आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती शेअर करत असते. याशिवाय अनेकदा ती फोटोही शेअर करताना दिसते. 
 

Web Title: hemangi kavi talk about period said menstruation women allowed in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.