रूपेरी पडद्यावर आणखीन सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री आपल्या चेह-याची  सर्जरी करत ग्लॅमरस लूक मिळवला आहे. यांत प्रियंका चोप्रापासून ते कोयना मित्रापर्यंत अनेक अभिनेत्रींनी या सर्जरी केल्या.मात्र काहींच्या सर्जरी फसल्या तर काही सर्जरीमुळे अधिक सुंदर दिसु लागल्या. हाच ट्रेंड स्टारकिंडसनीही फॉलो केला. जान्हवी कपूरचे नाव आवर्जुन घ्यावे.

 

तिनेही तिच्या बॉलिवूड डेब्युआधी फेशिअल सर्जरी केली होती. आता श्वेता त्रिपाठीच्या मुलगी पलक तिवारीनेही इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी फेशिअल सर्जरी केली आहे. मात्र अधिक सुंदर दिसण्याच्या नादात केलेली ही सर्जरी पलकला महागात पडणार असेच दिसतंय. कारण सर्जरीनंतर तिला ओळखणेही कठीण झाले आहे. सर्जरीनंतरचे तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसतायेत.सर्जरीमुळे पलकचा चेहरा आणखी खराब झाला. 


पलक श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. मात्र पलक आई श्वेताबरोबर राहात असून, तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कुठलीच कसर सोडत नसल्याचेच दिसून येत आहे. काही दिवसांपासून श्वेता घरगुती हिंसाचाराची बळी पडल्यामुळे चर्चेत आहे. श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. श्वेताने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनवने तिची मुलगी पलक हिलाही मारहाण केली. यानंतर मायलेकींनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती.

 
पोस्टमध्ये पलकने पुढे लिहिले आहे की, अभिनव कोहलीने कधीही मला कोणत्याही पद्धतीने चुकीचा स्पर्श केलेला नाहीये. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका... माझ्यावर आणि आईवर नेहमीच वाईट टिपण्णी करण्यात आलेली आहे. आमच्यासाठी कोणते शब्द वापरण्यात आले हे ऐकल्यावर कोणत्याही महिलेला राग येईल. हे आमचे खाजगी प्रकरण असून यावर कमेंट करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व असून तिने आजवर सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या आहेत. तिला कोणत्याही पुरुषाच्या पाठिंब्याची गरज नाहीये.

Web Title: Exclusive: Shweta Tiwaris daughter undergone facial surgery, now difficult to identify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.