'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:00 AM2023-02-14T07:00:00+5:302023-02-14T07:00:06+5:30

फोटोत निलेश साबळे दिसणारी ही क्युट मुलगी आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Do you recognize this cute girl seen with chala hawa yeu dya fame nilesh sable today she is a famous actress | 'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट मुलीला ओळखलंत? ‘अबोली’त साकारतेय महत्त्वाची भूमिका

googlenewsNext

 बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री अभिनेता निलेश साबळे (nilesh sable) याच्यासोबत दिसून येत आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निलेश साबळे. सध्या या लोकप्रिय अभिनेत्यासोबत एका अभिनेत्रीने तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शालेय वयात असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांचा फोटो व्हायरल होत असून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली गौरी कुलकर्णी आहे. गौरी लहान असताना तिने 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी हा फोटो काढल्याचं सांगण्यात येतं. 'ऑलमोस्ट सुफल संपूर्ण' या मालिकेत झळकलेली गौरी सध्या 'अबोली' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

Web Title: Do you recognize this cute girl seen with chala hawa yeu dya fame nilesh sable today she is a famous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.