'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 03:10 PM2021-02-26T15:10:11+5:302021-02-26T15:15:50+5:30

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतो.

Dakkhancha Raja Jyotiba Fan Moment On The Set | 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता

'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता

googlenewsNext

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडला. ज्योतिबावर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकताच सेटवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.

या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता, ‘अशा चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका लहान मुलांनाही आवडते आहे याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होतं आणि ते त्यांना आम्हा सर्वांसमोर सादर केलं. रसिकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना विशालने व्यक्त केली.


फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतो. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो.

 

खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे. ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.

Web Title: Dakkhancha Raja Jyotiba Fan Moment On The Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.