नेहा कक्कर- आदित्य नारायण पुन्हा ‘साथ-साथ’? नेहूने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:01 PM2020-05-05T12:01:54+5:302020-05-05T12:06:15+5:30

आदित्य व नेहाने ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर लग्नाची घोषणा केली होती. अर्थात असे काहीच झाले नाही...

coronavirus lockdown aditya narayan neha kakkar wants to be together-ram |  नेहा कक्कर- आदित्य नारायण पुन्हा ‘साथ-साथ’? नेहूने शेअर केला फोटो

 नेहा कक्कर- आदित्य नारायण पुन्हा ‘साथ-साथ’? नेहूने शेअर केला फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देनेहा कक्कर ही बॉलिवूडची आघाडीची गायिका आहे. आधी नेहा अभिनेता हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती़.

बॉलिवूडची सुपरस्टार सिंगर नेहा कक्कर  गाण्यांसोबत पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. आधी अभिनेता हिमांश कोहलीसोबतच्या तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर नेहा व आदित्य नारायण यांच्या लग्नाचा एपिसोड गाजला होता. आदित्य व नेहाने ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर लग्नाची घोषणा केली होती. अर्थात असे काहीच झाले नाही. ‘इंडियन आयडल 11’ संपले तसा नेहा व आदित्यच्या लग्नाचा ड्रामाही संपला. केवळ टीआरपीसाठी हा ड्रामा रचला गेला होता, हे यानंतर स्पष्ट झाले होते. पण आता नेहाच्या एका पोस्टनंतर तिच्या व आदित्यच्या लव्ह ड्राम्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

होय, नेहाने आदित्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात नेहा व आदित्य दोघेही एकमेकांचा हात पकडून आहेत. या फोटोपेक्षा या फोटोला दिलेले कॅप्शन पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘लॉकडाऊन संपल्यानंतर...,’ असे कॅप्शन नेहाने या फोटोला दिले आहे.
या कॅप्शनवरून आदित्य व नेहा पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा आहे. मात्र रिअल लाईफमध्ये की रिल लाईफमध्ये हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

गेल्या फेबु्रवारीत नेहा व आदित्य एक गाणे रिलीज झाले होते. नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने हे सिंगल कंपोज केले होते. हे गाणे तुफान गाजले होते. लोकांना गाण्यातील नेहा व आदीची केमिस्ट्रीही आवडली होती.

नेहा कक्कर ही बॉलिवूडची आघाडीची गायिका आहे. आधी नेहा अभिनेता हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती़. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपनंतर काही दिवस नेहा डिप्रेशनमध्येही गेली होती. पण आताश: ती यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे.

Web Title: coronavirus lockdown aditya narayan neha kakkar wants to be together-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.