12 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत ‘एन्गेज्ड’ झाली गौहर खान, थाटामाटात पार पडला साखरपुडा

By रूपाली मुधोळकर | Published: November 5, 2020 01:15 PM2020-11-05T13:15:22+5:302020-11-05T13:17:55+5:30

24 डिसेंबरला उडणार लग्नाचा बार

bigg boss winner gauahar khan gets engaged to zaid darbar will get married on 25 december | 12 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत ‘एन्गेज्ड’ झाली गौहर खान, थाटामाटात पार पडला साखरपुडा

12 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत ‘एन्गेज्ड’ झाली गौहर खान, थाटामाटात पार पडला साखरपुडा

googlenewsNext
ठळक मुद्देजैद हा गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तो एक कोरिओग्राफर आहे. येत्या 25 डिसेंबरला हे कपल लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

बिग बॉसच्या 7 व्या सीझनची विनर आणि अभिनेत्री गौहर खान सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. दीर्घकाळापासून गौहर संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबारचा मुलगा जैद दरबारला डेट करतेय आणि आता हे नाते बरेच पुढे गेले आहे. होय, गौहर व जैद यांनी नुकताच साखरपुडा केला. गौहर व जैद दोघांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
दोघांनीही सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोसोबत गौहरने अंगठीचा इमोजी पोस्ट केला आहे. तूर्तास गौहरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

जैद हा गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तो एक कोरिओग्राफर आहे. येत्या 25 डिसेंबरला हे कपल लग्न करणार असल्याचे मानले जात आहे. रिपोर्टनुसार, मुंबईच्या एका हॉटेलात सगळे फंक्शन होणार आहेत. 3 दिवस हा सोहळा चालणार आहे. अलीकडे गौहर स्पेशल गेस्ट बनून बिग बॉसच्या घरात गेली होती. दोन आठवडे बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर ती घरी परतली. यानंतर लगेच जैदसोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेली. गोव्याची ही ट्रिप प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खास प्लान करण्यात आली होती, असे कळते.

जैद याच्याआधी गौहर कुशाल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. बिग बॉस 7 या शोदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले.  

वर्ष 2012 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘इश्कजादे’ मधून उत्तम अभिनय सादर करत गौहर खानने बॉलिवूडकडे आपले लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल सुद्धा आहे. गौहरचा जन्म महाराष्ट्रात असलेल्या पुण्यातील एक मुस्लीम कुटुंबामध्ये 23 आॅगस्ट 1983 मध्ये झाला. गौहरने 2009मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकेट सिंग, सेल्ममॅन आॅफ द इअर चित्रपटात गौहर दिसली होती. यानंतर 2011मध्ये आलेल्या गेम या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ही गौहर झळकली होती. त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ब्रदीनाथ की दुल्हनिया आणि बेगम जान चित्रपटात ही तिने आपला दर्जेदार अभिनय सादर केला आहे. 

गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos

सफेद रंगाच्या गाउनमधील गोहरचे नवे फोटोशूट पाहिलेत का..?

Read in English

Web Title: bigg boss winner gauahar khan gets engaged to zaid darbar will get married on 25 december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.