गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:47 AM2020-08-24T11:47:58+5:302020-08-24T11:51:29+5:30

टीव्ही अभिनेत्री गौहर खानने आपला 37वा बर्थ डेची जबरदस्त पार्टी केली.`

Gauhar khan 37th birthday party with boyfriend zaid darbar see inside photos | गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos

गौहर खानच्या बर्थ डेला बॉयफ्रेंडने दिले सरप्राईज, See Inside Photos

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री गौहर खानने आपला 37वा बर्थ डेची जबरदस्त पार्टी केली. गौहरचा हा बर्थ डे खूपच स्पेशल होता. गौहरने कथित बॉयफ्रेंड जैद दरबारसोबत आपला बर्थ डे सेलिब्रेट केला. गौहरने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जैदने सुद्धा गौहरच्या बर्थ डे चे फोटो शेअर केले आहेत. जैदने फोटो शेअर करताना लिहिले, काश मी इथं सर्वकाही लिहू शकलो असतो, परंतु मी कमी शब्दांत लिहितो आणि तुझ्यासमोर सर्वकाही सांगेन. तुला माहिती आहे तू माझ्यासाठी काय आहेस G. हॅपी बर्थ डे Gau-ahar-jeous.' यावर कमेंट करताना गौहरने लिहिले, आतापर्यंत सगळ्यात बेस्ट बर्थडेसाठी थॅंक्यू, #WhatDreamsAreMadeOf'.


 जैद हा म्युझिक कंपोजर इस्माइल दरबारचा मुलगा आहे. जैद गौहर खानपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.जैदआधी गौहर खानचं नाव टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत जुळलं होतं. दोघांचं हे नातं बिग बॉसच्या घरात सुरू झालं होतं. दोघांचा सोबत एक म्युझिक व्हिडीओ सुद्धा होता. नंतर त्याचं ब्रेकअप झालं होतं.

Web Title: Gauhar khan 37th birthday party with boyfriend zaid darbar see inside photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.