‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:11 AM2021-09-06T11:11:02+5:302021-09-06T11:11:51+5:30

Bigg Boss OTT : अक्षरा बिग बॉसमधून एलिमिनेट होताच चाहते संतापले.अनेकांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली. 

bigg boss ott akshara singh fans angry on makers called show biased and trolled karan johar | ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बिग बॉस ओटीटी’बद्दल सांगायचं तर 8 ऑगस्टपासून सुरू झालेला हा शो 6 आठवड्यांपर्यंत चालणार आहे. 4 आठवडे पूर्ण झाले आहेत.

बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT)  हा रिअ‍ॅलिटी शो चाहत्यांना आवडतोय. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात शो बºयापैकी यशस्वी झाला आहे. पण काल रविवारी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये असं काही घडलं की, चाहते हैरान झालेत. होय, रविवारी दोन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आलं. शोचा होस्ट करण जोहरने पंजाबी गायक मिलिंद गाबा व भोजपुरी स्टार अक्षरा सिंग  (Akshara Singh) या दोघांनाही एनिमिनेट केलं. या शॉकिंग एलिमिनेशनने प्रत्येकजण शॉक्ड झाला. मिलिंद गाबाचं एलिमिनेशन कदाचित चाहत्यांना अपेक्षित असावं. पण अक्षराही बाहेर झालेली पाहून अनेकांचा राग अनावर झाला. मग काय? सोशल मीडियावर अनेकांनी बिग बॉस मेकर्सची चांगलीच शाळा घेतली. करण जोहरलाही (Karan Johar)अनेकांनी लक्ष्य केलं. चांगल्या स्पर्धकांना विनाकारण शो बाहेर करणं सुरू आहे, हा शो पक्षपाती आहे, करण जोहर फक्त आपल्या आवडत्या स्पर्धकांची बाजू घेतो, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

अक्षरा बिग बॉसमधून बाहेर पडताच, चाहते संतापले.अनेकांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली. अक्षरा सिंग शो बाहेर, हे मी अजूनही स्वीकारू शकतं नाहीये, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. चांगल्या व्यक्तिंनाच नेहमी शोमध्ये पक्षपाती वागणूक का मिळते? असा सवाल एका युजरने केला. आम्हाला अक्षरा सिंग हवी. नो अक्षरा, नो बिग बॉस, अशी कमेंट एका युजरने केली. अनेकांनी तर बिग बॉस ओटीटीवर बहिष्कार टाकण्याची मागणीही यानिमित्तानं केली.
चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया तुम्ही खाली वाचू शकता...

‘बिग बॉस ओटीटी’बद्दल सांगायचं तर 8 ऑगस्टपासून सुरू झालेला हा शो 6 आठवड्यांपर्यंत चालणार आहे. 4 आठवडे पूर्ण झाले आहेत. तूर्तास शमिता शेट्टी, नेहा भसीन, राकेश बापट, मूस जट्टाना, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल व निशांत भट असे 7 स्पर्धक शोमध्ये टिकून आहेत.

Web Title: bigg boss ott akshara singh fans angry on makers called show biased and trolled karan johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.