Bigg boss marathi: आदिश करतोय मनमानी हुकूमशाही? लहानशा चुकीमुळे जयला धरावे लागणार त्याचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:30 PM2021-12-08T17:30:00+5:302021-12-08T17:30:00+5:30

Bigg boss marathi: एका लहानशा चुकीमुळे जयला घरात मोठी शिक्षा मिळणार आहे. त्याला चक्क सगळ्यांसमोर आदिशचे पाय धरावे लागणार आहेत.  

Bigg boss marathi Jaya will have to hold adish vaidjyas feet due to a small mistake | Bigg boss marathi: आदिश करतोय मनमानी हुकूमशाही? लहानशा चुकीमुळे जयला धरावे लागणार त्याचे पाय

Bigg boss marathi: आदिश करतोय मनमानी हुकूमशाही? लहानशा चुकीमुळे जयला धरावे लागणार त्याचे पाय

googlenewsNext

बिग बॉसच्या (bigg boss) घरात सध्या लिलिपूट नगराचं राज्य आलं आहे. या राज्याचे हुकूमशहा स्नेहा (sneha wagh), आदिश (adish vaidya) आणि तृप्ती देसाई (trupti desai) असल्यामुळे ते त्यांना वाट्टेल ती काम त्यांच्या प्रजेकडून करुवून घेत आहेत. यामध्येच एका लहानशा चुकीमुळे जयला (jay dudhane) घरात मोठी शिक्षा मिळणार आहे. त्याला चक्क सगळ्यांसमोर आदिशचे पाय धरावे लागणार आहेत.  

सध्या घरात सदस्यांना साप्ताहित कार्य सोपवण्यात आलं आहे. या कार्यात प्रत्येकाच्या संयमाची कसोटी लागणार आहे. यात हुकूमशहा जे सांगतील ते प्रजेला ऐकणं बंधनकारक आहे. यामध्येच जयला हुकूमशहा आदेशचं कौतुक करण्यासोबतच त्याचे पाय धरावे लागणार आहेत. 

"सर्वगुण संपन्न खेळाडू होते आणि अजूनही आहेत. आणि ते deserve करत होते म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ते अतिशय उत्तमरित्या प्रत्येक कार्य पार पाडत होते हे मी पाहिलंय. मग ते भोपळ्याचं कार्य असो वा अन्य.  त्यांच्याबरोबर खेळताना एक वेगळीच ऊर्जा असायची, मज्जा आली खेळताना. बारा आठवडे झाले. पण, ज्यावेळेस आदिश घरामध्ये होते तो क्षण मी कधीच विसरू शकतं नाही. कारण, आदिश याने संपूर्ण घराला हलवून सोडलं होतं", असं म्हणत जय आदिशचं कौतुक करत होता.

दरम्यान,जय कौतुक करत असतांनाच अचानकपणे त्याला आदिशचे पाय धरावे लागले. आता कोणत्या चुकीमुळे जयवर पाय धरण्याची वेळ आली. की मुद्दामच जयने हे केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Bigg boss marathi Jaya will have to hold adish vaidjyas feet due to a small mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.