ठळक मुद्दे'माझे आयुष्यात एकच ड्रीम आहे, मला ए.आर रेहमान यांच्यासोबत काम करायचयं.'' तिची ही इच्छा ऐकताच दिगंबर आणि अभिजीत तिला शुभेच्‍छा देत म्‍हणतात, ''तथास्‍तु, तथास्‍तु.''

'बिग बॉस मराठी २' मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक वैशाली माडेने आजवर अनेक हिंदी आणि मराठी गाणी गायली आहेत. तिने एक गायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली असली तरी तिची गायनक्षेत्रातील एका दिग्गजासोबत काम करण्याची इच्छा आजही अपुरी राहिली असल्याचे तिने बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच सांगितले.

बिग बॉसच्या घरातील अनेक स्‍पर्धक आपली अनेक स्वप्न उराशी बाळगून या घरात आली आहेत. घरातील आपल्या मित्रमैत्रिणींना ते अनेकवेळा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी, आपल्या आयुष्यातील खास गोष्टींविषयी सांगत असतात. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये दिगंबर नाईक, बाप्‍पा आणि अभिजीत केळकरसह वैशाली माडे गार्डनमध्‍ये बसलेले दिसत आहेत. अभिजीत वैशालीला तिच्‍या सर्वात मोठ्या स्‍वप्‍नाबाबत विचारत आहे.

अभिजीतचा हा प्रश्न ऐकल्यानंतर वैशाली काही मिनिटांसाठी शांत राहाते. माझ्या आयुष्यातील हे स्वप्न सांगू की नको या द्वीधा मनस्थितीत ती अडकली असल्याचे जाणवते. पण नंतर ती सांगते, ''माझे आयुष्यात एकच ड्रीम आहे, मला ए.आर रेहमान यांच्यासोबत काम करायचयं.'' तिची ही इच्छा ऐकताच दिगंबर आणि अभिजीत तिला शुभेच्‍छा देत म्‍हणतात, ''तथास्‍तु, तथास्‍तु.'' वैशाली पुढे म्‍हणते, ''ए. आर रेहमान यांच्यासोबत गायचंय मला. त्‍यांनी संगीत दिलेले गाणे गायचेय आणि त्‍यांच्‍यासोबत रेकॉर्डिंग करायचंय.''

तसेच या गप्पा सुरू असताना वैशाली मनोरंजन क्षेत्र किती अनपेक्षित आहे याबाबत सांगते. ती म्हणते, ''हे इतकं अनप्रेडीक्‍टेबल फिल्‍ड आहे, कधीही काहीही होऊ शकतं. कधीही कॉल येऊ शकतो, सांगते ना मी, इथे ज्‍यादिवशी निघाले सकाळी, त्‍या सकाळी मला फोन आला तो म्हणजे प्रसिद्ध गायक अंकित तिवारीच्‍या ग्रुपमधून... त्यांनी मला विचारले की, या आठवड्यात काय शेड्यूल आहे तुझं?.''

आम्‍ही आशा करतो की, ए.आर. रेहमान हे ऐकत असतील आणि वैशालीचे त्यांच्यासोबत गाण्‍याचे स्‍वप्‍न लवकरात लवकर पूर्ण होईल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss marathi contestant vaishali made wants to work with A. R. Rahman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.