Bigg Boss 3: "मी कसं बोलायचं हे तू सांगू नकोस"; 'त्या' प्रकरणानंतर सोनालीने केली आदिशवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:30 PM2021-10-20T13:30:00+5:302021-10-20T13:30:00+5:30

Bigg boss marathi: आदिश आणि सोनालीमधील वाद विकोपाला गेला असून सोनाली मोठ्या आवाज आदिशवर ओरडते.

bigg boss marathi adish and sonali kitchen tast | Bigg Boss 3: "मी कसं बोलायचं हे तू सांगू नकोस"; 'त्या' प्रकरणानंतर सोनालीने केली आदिशवर आगपाखड

Bigg Boss 3: "मी कसं बोलायचं हे तू सांगू नकोस"; 'त्या' प्रकरणानंतर सोनालीने केली आदिशवर आगपाखड

Next
ठळक मुद्देआता आदिश- सोनालीमधील वाद कुठपर्यंत वाढतो हे आजच्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरातील प्रत्येक सदस्य लहानसहान कारणावरुन एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहे.  विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे स्पर्धक एकदा सुरु झालेलं भांडण लवकर मिटवण्याचाही प्रयत्न करत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या घरातील वाद वाढताना दिसत आहे. अलिकडेच भात शिजवण्यावरुन तृप्ती देसाई आणि सोनालीमध्ये वाद रंगला होता. त्यानंतर आता सोनाली आणि आदिशमध्ये भांडण होणार आहे. 

आजच्या भागात आदिश आणि सोनाली यांच्यामध्ये पोळ्या करण्यावरुन वाद होणार आहे. गायत्री पोळ्या लाटत असताना सोनाली आणि आदिश त्यावर चर्चा करत असतात. यामध्येच बोलता बोलता त्यांच्यात वादाची ठिणगी पडते. 

आदिश आणि सोनालीमधील वाद विकोपाला गेला असून सोनाली मोठ्या आवाज आदिशवर ओरडते. ज्यामुळे "एक मिनीट माझ्यावर आवाज चढवू नकोस. फुकट आवाज चढवायचा नाही", असं आदिश म्हणतो. त्यावर "मी आवाज चढवत नाही. तू बोलायला लागलास तर मी उत्तर पण द्यायचं नाही का? आणि कुठल्या आवाजात सांगायचं ते तू मला नको सांगूस. माझा आवाज असाच आहे मी असंचं बोलणार...," असं प्रत्युत्तर सोनाली देते.

दरम्यान, आता आदिश- सोनालीमधील वाद कुठपर्यंत वाढतो हे आजच्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोबतच आजच्या भागात बिग बॉसच्या घरात आलेली आज्जी स्पर्धकांना चांगला ओरडाही देणार आहे.
 

Web Title: bigg boss marathi adish and sonali kitchen tast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app