"एखादा माणूस अचानकपणे सोडून जातो..."; वडिलांच्या आठवणीत सोनाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:11 PM2021-09-21T16:11:52+5:302021-09-21T16:13:25+5:30

Bigg Boss Marathi 3 : हा शो सुरु होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत. त्यामुळे घरातील स्पर्धक त्यांच्या कुटुंबीयांना चांगलंच मिस करत आहेत.

bigg boss marathi 3 sonali patil cry because she miss her daddy | "एखादा माणूस अचानकपणे सोडून जातो..."; वडिलांच्या आठवणीत सोनाली भावुक

"एखादा माणूस अचानकपणे सोडून जातो..."; वडिलांच्या आठवणीत सोनाली भावुक

Next
ठळक मुद्देपहिल्याच मालिकेच्या वेळी वडिलांनी सोडली सोनालीची साथ

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. हा शो सुरु होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत. त्यामुळे घरातील स्पर्धक त्यांच्या कुटुंबीयांना चांगलंच मिस करत आहेत. यामध्येच आता हळूहळू घरातील सदस्यांची एकमेकांसोबत मैत्री होऊ लागली आहे. तर, काही जणांचे वादही रंगू लागले आहेत. मात्र, या सगळ्यात सोनाली पाटील आणि शिवलीला यांची चांगली मैत्री झाली आहे. विशेष म्हणजे सोनालीने तिच्या वडिलांच्या काही आठवणी शिवलीलासोबत शेअर केल्या आहेत. 

"माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला. माझी मालिका सुरु असतानाचा वडिलांचं निधन झालं. माझी सगळ्यात पहिली मालिका 'वैजू नं. १' त्यांनी पाहिलीच नाही. त्यांना काहीच झालं नव्हतं.  अचानकपणेच ते सोडून गेले. ज्यावेळी एखादा माणूस तुम्हाला अचानकपणे सोडून जातो ना त्याचंच जास्त वाईट वाटतं", असं म्हणत सोनालीच्या डोळ्यात पाणी तरळलं.

अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

सोनालीच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर शिवलीलाने तिची समजूत काढली.  "तुझा सुरु झालेला प्रवास त्यांनी पाहिला नाही असं तुला वाटतंय ना. पण तसं नाहीये. ते आजही तुझ्याकडे पाहतायेत. आता ते जिथे कुठे असतील तिकडून तुला 'बिग बॉस'च्या घरात पाहात असतील. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस", असं म्हणत शिवलीलाने सोनालीची समजूत काढली.

दरम्यान, बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु झाल्यापासून यात अनेक नवनवीन गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. या घरात प्रवेश केल्यापासून मीरा जगन्नाथ चर्चेत आली आहे. मीरा या शोमध्ये सहभागी झाल्यापासून ती सातत्याने प्रत्येक सदस्यासोबत भांडत आहे. त्यामुळेच मीरा या शोमध्ये कशाप्रकारे बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
 

Web Title: bigg boss marathi 3 sonali patil cry because she miss her daddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app