अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:55 AM2021-09-21T11:55:47+5:302021-09-21T11:58:32+5:30

Urfi javed: काही दिवसांपूर्वी चित्रविचित्र टॉप घातल्यामुळे चर्चेत आलेली ऊर्फी आता पुन्हा एकदा तिच्या जीन्समुळे चर्चा आली आहे. 

urfi javed bigg boss ott contestant wears trouser with open button and zip | अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऊर्फी जावेद हिचा एअरपोर्ट लूक व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) 'बिग बॉस ओटीटी'मुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. 'बिग बॉस ओटीटी' गाजवल्यानंतर ऊर्फी तिच्या अतरंगी स्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रविचित्र टॉप घातल्यामुळे चर्चेत आलेली ऊर्फी आता पुन्हा एकदा तिच्या अशाच फॅशनमुळे चर्चेत आली आहे. यावेळी ऊर्फीने परिधान केलेल्या जीन्समुळे तिची चर्चा होत असून अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऊर्फी जावेद हिचा एअरपोर्ट लूक व्हायरल होत आहे. यामध्ये ऊर्फीने एक अतरंगी फॅशन कॅरी केली आहे. यात तिने क्रॉप टॉप आणि चौकटींची पॅण्ट परिधान केली आहे. मात्र, यावेळी ऊर्फीच्या जीन्सची बटणं उघडी असल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.  प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने ऊर्फीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण

नेटकऱ्यांनी केलं ऊर्फीला ट्रोल

पॅण्टची बटणं बंद करायची विसरलीस का?, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, जीन्स बंद न करता अशीच उघडी ठेवायची फॅशन आलीये का?, असं अन्य एक युजर म्हणाला आहे. इतकंच नाही तर, पॅण्टची बटणं उघडी ठेवायची फॅशन आहे का, निर्लज्ज बाई. या लोकांना लाज कशी वाटत नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे.

यापूर्वीही झाली होती ऊर्फी ट्रोल

यापूर्वी ऊर्फी तिच्या क्रॉप टॉपमुळे ट्रोल झाली होती.  ज्यात तिने डेनिमचं शॉर्ट जॅकेट घातलं होतं. ज्यामधून तिचे अंतवस्त्र दिसत होते. त्यावेळीदेखील ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती.

'मुली दान करायची गोष्ट नाही'; कन्यादानाच्या 'त्या' जाहिरातीमुळे आलिया ट्रोल


 

कोण आहे ऊर्फी?

अलिकडेच ऊर्फी बिग बॉस ओटीटीमध्ये झळकली होती. यापूर्वी ती  'चंद्र नंदिनी',' मेरी दुर्गा', बेपनाह', 'जीजी मां और डायन' या मालिकांमध्ये झळकली आहे.
 

Web Title: urfi javed bigg boss ott contestant wears trouser with open button and zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.