Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांवर नजर ठेवायला आली ही व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:31 PM2021-10-18T12:31:57+5:302021-10-18T12:32:14+5:30

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस यांनी घरामध्ये स्वागत केले एका खास व्यक्तीचे.

Bigg Boss Marathi 3: This is the person who came to keep an eye on the members in the house of Bigg Boss Marathi | Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांवर नजर ठेवायला आली ही व्यक्ती

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांवर नजर ठेवायला आली ही व्यक्ती

googlenewsNext

 बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सुरेखा कुडची यांना घराबाहेर जावे लागले. आता सुरू झाला नवीन आठवडा… बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार नवीन टास्क… या आठवड्यात बिग बॉस घरातील सदस्यांना खास सरप्राईझ देणार आहेत. काल समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये स्वागत केले एका खास व्यक्तीचे. सदस्यांचा आनंद त्या घोषणेनंतर गगनात मावेनासा झाला आहे. (Bigg Boss Marathi 3)

सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये धावत गेले कारण तितकी खास, जवळची व्यक्ती घरामध्ये आली त्यांना दिसली. घरामध्ये आवाज घुमला आजीचा! हो आजीचा... “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे... हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला”.


 
प्रत्येक नाते खास असते... प्रत्येक नात्यात काही देवाण घेवाण सुरू असते. पण आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी आपल्याला प्रत्येक वेळेला निरपेक्ष भावनेने काही ना काही देत असते आणि ती व्यक्ती म्हणजे आपली आजी. आई वडील ओरडल्यावर तीच असते जी आपल्याला समजावते... तीच असते जी वेळप्रसंगी आपल्यासारखी लहान होऊन आपल्याशी खेळते, मैत्री करते आणि लाड पुरवते. खोडी केल्यावर मायेने धपाटा देखील घालते. बिग बॉस आज घरामध्ये आजीचे मन:पूर्वक स्वागत करणार आहेत. बघूया घरामध्ये काय धम्माल मस्ती घडते.

Web Title: Bigg Boss Marathi 3: This is the person who came to keep an eye on the members in the house of Bigg Boss Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.