'खेळाडू म्हणून तुम्ही अपयशी'; महेश मांजरेकर तृप्ती देसाईंवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:51 PM2021-10-24T16:51:47+5:302021-10-24T16:52:17+5:30

Bigg boss marathi 3: कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर घरातील प्रत्येक सदस्याची शाळा घेताना दिसत आहेत.

bigg boss marathi 3 mahesh manjarekar bigg bosschi chawdi trupti desai | 'खेळाडू म्हणून तुम्ही अपयशी'; महेश मांजरेकर तृप्ती देसाईंवर संतापले

'खेळाडू म्हणून तुम्ही अपयशी'; महेश मांजरेकर तृप्ती देसाईंवर संतापले

Next
ठळक मुद्देतृप्ती देसाईंनी स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजरेकरांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.

'बिग बॉस मराठी'मध्ये (bigg boss marathi) दर आठवड्याला रंगणारी 'बिग बॉस'ची चावडी पाहणं अनेकांना आवडतं. या चावडीवर संपूर्ण आठवड्यात घडलेल्या घडामोडींचा महेश मांजरेकर (mahesh manjarekar) आढावा घेतात. वेळप्रसंगी स्पर्धकांची कानउघडणीही करतात. सध्या या आठवड्यातल्या 'बिग बॉस'च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी तृप्ती देसाई (trupti desai) यांची कानउघडणी केली आहे. केवळ कान उघडणीच नव्हे तर 'तुम्ही खेळाडू म्हणून अपयशी आहात', असंही थेट म्हटलं आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर घरातील प्रत्येक सदस्याची शाळा घेताना दिसत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी सोनाली पाटील ( sonali patil) आणि तृप्ती देसाई यांना चांगलंच धारेवर धरलं.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Oct: घरात पुन्हा रंगणार नवीन राडे; रेशम टिपणीसची होणार दमदार एण्ट्री
 

"नुकत्याच रंगलेल्या टास्कमध्ये तुम्ही एक वाईट कॅप्टन ठरलात. इतकंच नाही तर या खेळामध्ये तुम्ही एक अपयशी खेळाडू ठरला आहात. तुम्ही जो निकाल दिला तो योग्य नव्हता", असं महेश मांजरेकर म्हणाले. त्यावर तृप्ती देसाईंनी स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजरेकरांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.

दरम्यान, यावेळी मांजरेकरांनी सोनालीलादेखील चार शब्द सुनावले आहेत. बिग बॉसच्या घरात आल्यावर तू वेगळं काय केलंस? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता आज रंगणाऱ्या चावडीवर मांजरेकर उर्वरित सदस्यांची कशी शाळा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 3 mahesh manjarekar bigg bosschi chawdi trupti desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app