Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Oct: घरात पुन्हा रंगणार नवीन राडे; रेशम टिपणीसची होणार दमदार एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:23 AM2021-10-24T11:23:32+5:302021-10-24T11:24:23+5:30

Resham tipnis: रेशमने घरात एण्ट्री केल्यावर घरातील स्पर्धकांमध्ये आपापसात वाद होत असल्याचंही दिसून येत आहे.

marathi tv show bigg boss marathi 3 resham tipnis and megha dhade | Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Oct: घरात पुन्हा रंगणार नवीन राडे; रेशम टिपणीसची होणार दमदार एण्ट्री

Bigg Boss Marathi 3 Episodes, 24 Oct: घरात पुन्हा रंगणार नवीन राडे; रेशम टिपणीसची होणार दमदार एण्ट्री

Next
ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर रेशमचा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकतेच या घरातून दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. त्यामुळे घरातील अन्य स्पर्धकांमध्ये आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची शर्यत सुरु झाली आहे. इतकंच नाही तर दिवसेंदिवस स्पर्धकांना देण्यात येणारे टास्क अवघड होत चालले आहेत. त्यामुळे अनेकदा टास्क खेळताना स्पर्धकांना शाब्दिक वाद तर कधी मारामारी होतांना दिसत आहे. यामध्येच आता या तिसऱ्या पर्वात पहिल्या पर्वाची माजी स्पर्धक रेशम टिपणीस (resham tipnis) सहभागी होणार आहे. त्यामुळे घरात पुन्हा नवीन राडे रंगताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर रेशमचा बिग बॉसच्या घरातील (bigg boss marathi house) व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेशम आणि मेघा धाडे (megha dhade) बिग बॉसच्या घरात सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघींची घरात एण्ट्री झाल्यावर घरातील स्पर्धकांमध्ये आपापसात वाद होत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची एण्ट्री होताच घरात राडे सुरु झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये रेशम आणि मेघा जरी बिग बॉसच्या घरात दिसत असल्या तरीदेखील त्या केवळ स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी येणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या  दोघी जणी केवळ एका दिवसापूरत्याच या शोमध्ये सहभागी होणार आहेत.
 

Web Title: marathi tv show bigg boss marathi 3 resham tipnis and megha dhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app