ठळक मुद्देदीपक यांनी मला 'हफ्ता बंद' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली. तेव्‍हा फोन म्‍हणजे लँडलाइन असायचे. आम्ही रात्र-रात्रभर फोनवर बोलायचो.

किशोरी शहाणेबिग बॉस मराठीच्या घरामध्‍ये त्यांच्या जीवनातील दोन सर्वात महत्‍त्‍वपूर्ण व्‍यक्‍तींविषयी बोलताना दिसणार आहेत. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या दोन व्यक्ती म्हणजे त्यांचे पती दीपक बलराज वीज आणि मुलगा बॉबी हे आहेत. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणेआरोह वेलणकरला जॅकी श्रॉफ यांनी दीपक बलराज वीज आणि त्यांची भेट कशाप्रकारे घडवून आणली याबाबत सांगताना दिसत आहेत. 

 

आरोह गप्पा मारत असताना किशोरी शहाणे यांना त्यांच्या प्रेमकथेविषयी विचारतो. तेव्हा त्या सांगतात, दीपक हे प्रसिद्ध दिग्‍दर्शक आणि लेखक आहेत. त्‍यांनी २२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'हफ्ता बंद'मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता. त्याचवेळी माझे एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. जॅकीची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. तो महाकाली येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये चित्रपटाचे चित्रीकरण करायला यायचा. तिथे आम्ही एक फॅन म्हणून त्याची ऑटोग्राफ घ्यायला, त्याला भेटायला जायचो. अनेक भेटीनंतर आमची खूप चांगली मैत्री झाली. तेव्‍हा तो मला म्‍हणाला 'एक डायरेक्‍टर है... उनको फिल्म के लिये मराठी ॲक्‍ट्रेस चाहिये...' त्यामुळे जॅकीने माझी ओळख करून दीपक सोबत करून दिली.'' 

पुढे किशोरी सांगतात, ''दीपक यांनी मला 'हफ्ता बंद' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली. तेव्‍हा फोन म्‍हणजे लँडलाइन असायचे. आम्ही रात्र-रात्रभर फोनवर बोलायचो. घरातल्यांना कळू नये म्हणून मी लपून छपून फोनवर बोलायचे. त्यानंतर काहीच वर्षांत आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण सुरुवातीला एक-दोन वर्षं आमच्यात केवळ मैत्री होती.'' 

हे सगळे ऐकून आरोह अचंबित होऊन लग्नाला घरातल्यांचा पाठिंबा होता की नाही हे विचारतो. त्यावर किशोरी सांगतात, हफ्ता बंद या चित्रपटानंतर दीपक यांनी मला 'बॉम्‍ब ब्‍लास्‍ट' या चित्रपटात घेतले. पण आमच्या नात्‍याबाबत आईवडिलांना समजल्‍यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली. मात्र काहीच महिन्यात त्यांनी देखील आमच्या नात्यासाठी होकार दिला आणि आम्ही लग्न केले. 

Web Title: Bigg Boss Marathi 2 : bigg boss marathi 2 contestants kishori shahane and deepak balraj vij love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.