ठळक मुद्देया सहा जणांमधून आता आरोह वेलणकर आणि किशोरी शहाणे बाहेर पडले आहेत.

बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले आज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. शीव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे यांच्यामधील एकाला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख मिळणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या सहा जणांमधून आता आरोह वेलणकर आणि किशोरी शहाणे बाहेर पडले आहेत. किशोरी शहाणे या कार्यक्रमात सुरुवातीपासून होत्या तर वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे या घरात आरोहची एंट्री झाली होती. या घरात आता चार स्पर्धक शिल्लक राहिले असून या सगळ्यांमधून कोण विजेता ठरतेय हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. शीव ठाकरे आणि नेहा शितोळे यांना या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. या दोघांपैकी एखादा विजेता ठरेल अशी सोशल मीडियवर चर्चा आहे.

किशोरी शहाणे या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री असून त्यांनी अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तर आरोहने रेगे या चित्रपटाद्वारे त्याच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याची ही पहिलीच फिल्‍म खूप हिट झाली होती. त्याने आजवर तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या एका चित्रपटाची नायिका ही शिवानी सुर्वे होती. त्याच्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवासाविषयी बिग बॉस मराठीत त्याने गप्पा मारताना सांगितले होते की, ''मी जेव्‍हा मराठी इंडस्‍ट्रीमध्‍ये आलो तेव्‍हा मी बिलकुल गुड लुकिंग नव्‍हतो, खूप सुकडा होतो. बहुधा त्यामुळेच घेतलं होतं मला रेगेमध्‍ये. २०१३ मध्‍ये मी केवळ ५२ किलोचा होतो. त्‍यानंतर मग मी वजन वाढवले. रेगे चित्रपट खूप हिट झाला होता. मला आणि लय भारीसाठी रितेश देशमुखला फिल्‍मफेअरमध्‍ये नॉमिनेशन होतं बेस्‍ट डेब्‍यू इन मराठीसाठी. तो पुरस्कार रितेशला मिळाला. पण मला पदार्पणासाठी दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला होता.''

रेगे' सिनेमाच्या यशानंतर अल्पावधीतच आरोह वेलणकर रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला. घंटा, होस्टेल डेज या चित्रपटात देखील त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्याने चित्रपटांसोबत काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. WHY So गंभीर या नाटकाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. 


Web Title: Bigg Boss Marathi 2: Aroh Welankar and Kishori Shahane out from the race to finale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.