Bigg Boss Marathi 2: This actor got wild card entry in bigg boss house | Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात या अभिनेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री
Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात या अभिनेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विकेंडचा डाव रंगणार आहे. कोण या आठवड्यामध्ये चुकलं ? कोण चांगल खेळल ? कोण वाईट खेळल ? कोण स्टार परफॉर्मर बनणार ? हे महेश मांजरेकर यांनी सांगितलं. पण, आज घरामध्ये रेगे चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि दमदार भूमिका सादर करून मने जिंकलेला आरोह वेलणकर याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.


आरोह हा मूळचा पुण्याचा आहे. आरोहने घंटा या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. आता घरामध्ये सदस्यांचे काय म्हणणे असेल ? तो कोणत्या ग्रुपच्या बाजूने खेळेल ? की तो वैयक्तिक गेम खेळेल ? हे बघणे रंजक ठरणार आहे.


बिग बॉस मराठीच्या घरातील स्टोर रूममधून हा सदस्य अचानकच गायब झाला आणि सदस्यांना तो नक्की कुठे गेला आहे हे समजत नव्हते. काही सदस्यांना वाटले कि हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरामध्ये मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरु झाला होता.

 अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा आवाज “मला बाहेर काढा” हा आवाज आल्यावर सगळ्यांच भीती वाटली. शिव, विणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर आले. अभिजीत मला बाहेर काढा इतकच म्हणत होता.

त्यामुळे शिव आणि विणाबरोबर इतर सदस्यांची घाबरगुंडी उडाली.


Web Title: Bigg Boss Marathi 2: This actor got wild card entry in bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.