Bigg Boss Finalist Aroha Velankar Support To Flood Affected People In Kolhapur | बिग बॉस मराठी फायनलिस्ट आरोह वेलणकर पुरग्रस्तांच्या मदतीला सरसावला, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमानास्पद
बिग बॉस मराठी फायनलिस्ट आरोह वेलणकर पुरग्रस्तांच्या मदतीला सरसावला, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमानास्पद

बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकरने सगळे टास्क बेधडकपणे खेळला होता.समोरची व्यक्ती ही केवळ त्याच्यासाठी प्रतिस्पर्धी असते. भावना बाजूला ठेऊन केवळ टास्क जिंकण्याकडे त्याचे लक्ष  होते.  टास्क खेळताना त्याने कधीच बळाचा वापर केला नाही. प्रत्येक टास्क तो बुद्धिचातुर्याने खेळल्यामुळे त्याचे कौतुक झाले होते.  

आता पुन्हा एकदा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आरोह वेलणकरने नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा मदतनिधी दिला. मुख्यमत्र्यांच्या कार्यालयातून आरोहच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी ट्विटही करण्यात आले. 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर याविषयी सांगतो, “माझा सामाजिक कार्य करण्याकडे पूर्वीपासूनच कल असल्याने मी अशी मदत एरवी नेहमी करत असतो. त्याविषयी बोलायला मला जास्त आवडत नाही. पण ह्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच याविषयी ट्विट केले आहे.”


तो पूढे म्हणतो, “जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो. तेव्हा महाराष्ट्रावर एवढे मोठे संकंट कोसळले होते. बाहेर आल्यावर मला ह्या गोष्टीची जाणीव झाली. ह्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आर्थिक बळाची आवश्यकता असते. आपणही त्यात खारीचा का होईना वाटा उचलावा ही इच्छा झाली. आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मदतनिधी दिला. आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो. सूत्रांच्या अनुसार, आरोहच्या ह्या उपक्रमामूळे त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


Web Title: Bigg Boss Finalist Aroha Velankar Support To Flood Affected People In Kolhapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.