बिग बॉस १३ मधील या सदस्यावर ती १३ वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:39 PM2020-01-11T16:39:46+5:302020-01-11T16:40:38+5:30

या सदस्याने तिच्या आयुष्यातील सांगितलेल्या या कटू अनुभवाविषयी ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटे उभे राहिले.

Bigg Boss 13: Krushna’s sister Arti reveals an attempt to rape was made on her at the age of 13 | बिग बॉस १३ मधील या सदस्यावर ती १३ वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न

बिग बॉस १३ मधील या सदस्यावर ती १३ वर्षांची असताना झाला होता बलात्काराचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देआरती केवळ १३ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता असे तिने घरातील सगळ्या सदस्यांना सांगितले. आरती सांगते, त्यावेळी मी फक्त १३ वर्षांची होती. आजही तो प्रसंग आठवला तर मी भीतीने कापयला लागते. 

छपाक या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या सुरू असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. ती आता बिग बॉसच्या घरात झळकणार आहे. बिग बॉस १३ मध्ये आपल्याला दीपिकासोबतच लक्ष्मी अग्रवालला आणि विक्रांत मेस्सी यांना देखील पाहायला मिळणार आहे. 

बिग बॉस १३ चा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोमध्ये लक्ष्मी अग्रवाल तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याविषयी सांगताना दिसत आहे. तिच्या आयुष्यातील हा कटू प्रसंग ऐकल्यावर बिग बॉसमधील मंडळींचे डोळे पाणावलेले आपल्याला दिसून येत आहेत. यानंतर घरातील प्रत्येक सदस्य त्याच्या आयुष्यातील वाईट घटनांविषयी सांगताना दिसत आहे.

बिग बॉस १३ मधील स्पर्धक आरती सिंगने तिच्या आयुष्यातील सांगितलेला एक प्रसंग ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटे उभे राहिले. आरती केवळ १३ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता असे तिने घरातील सगळ्या सदस्यांना सांगितले. आरती सांगते, त्यावेळी मी फक्त १३ वर्षांची होती. आजही तो प्रसंग आठवला तर मी भीतीने कापयला लागते. 

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये गोविंदाची भाची आरती सिंग हिचा प्रवास चाहत्यांना भावतो आहे. आरतीने ‘मायका’ या शोमधून टीव्हीवर डेब्यू केला होता. उडान, देवो के देव महादेव, वारिश, गृहस्थी, ससुराल सिमर का, उतरन यासारख्या अनेक मालिकांमध्ये दिसणारी आरती सिंह टीव्ही इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे.

Web Title: Bigg Boss 13: Krushna’s sister Arti reveals an attempt to rape was made on her at the age of 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.